Latur Earthquake : राज्यात झालेला सर्वात विध्वसंक भूकंप म्हणजे, लातूरचा भूकंप. या भूकंपाला आज ३० वर्षे पूर्ण होत झाली. या पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. भूकंपाच्या वेळी पवारांचा किल्लारीला पुन्हा उभं करण्यात शरद पवारांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच भूकंपग्रस्त लोकांनी पवारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी बोलतांना पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजचा दिवस हा अस्वस्थ करणारा दिवस आहे. या दिवसाच्या आठवणींनी आजही अंगावर शहारा येतो, असं पवार म्हणाले.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यावर अनेक जबाबरारी असतात. त्यातील एक म्हणजे गणपती विसर्जनाच दिवस. राज्यातील शेवटचा गणपती विसर्जन होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना झोप येत नाही. मी गणपती विसर्जनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेत होता. त्यानंतर पावणे चार वाजता मी झोपायला जात होतो. अंग टाकलं अन् घरातील सर्व सामान हललं होतं. घराच्या दारं-खिडक्या हलल्या. माझ्या लक्षात आल की, हा भूकंप आहे. त्यामुळं कोयनेला फोन केला, विचारलं की, भुकंप झाला का? त्यावेळी त्यांना मला सांगितलं की, लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंप झाला. नंतर मी लगेच सगळ्या अधिकाऱ्यांना उठवलंस विमानाची व्यवस्था केली आणि सकाळी सहा वाजता थेट किलारीला आलो, असं पवार म्हणाले.
मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर : वाघनाखांवरील प्रश्नचिन्हावरुन भाजपची आदित्य ठाकरेंवर टीका
इथं आल्यावर लक्षात आलं की, इथं किल्लारी गाव नाहीच. सगळं नुकसान झालं होतं. निसर्गाची अवकृपा झाली होती. प्रेत पडली हती. मी पुढील तीन तासांत मी सर्व वरिष्ठ डॉक्टरांना बोलावले आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली. पद्मसिंह पाटील, विलास देशमुख यांच्यावरही जबाबदारी सोपवली. मी येथे जवळपास 15 दिवस राहिलो. सकाळी सात वाजल्यापासून दोन्ही जिल्ह्यात जाऊन आढावा घेत राहिलो. संकट मोठे होत चालले होते मात्र या दोन तालुक्यातील जनतेने या संकटाचा धैर्याने सामना केला, असं पवार म्हणाले.
कलेक्टर बैलगाडीत झोपलेला दिसला….
यावेळी पवारांनी एक किस्साही सांगितलं. ते म्हणाले, रात्री अडीच तीन वाजता फिरत होतो, तेव्हा मला एक बैलगाडी दिसली. त्यात एकजण झोपलेला मला दिसला. मी म्हटलं याला भेटलं पाहिजे. मी थेट त्याला उठवलं, तर ते तुमचे कलेक्टर प्रवीण परदेशी होते, दिवसभर काम करून हे कलेक्टर रात्रीची विश्रांती घेत होते, अशी आठवण पवारांनी सांगितलं.