Sharad Pawar : पार्थ पवार बोहल्यावर चढणार? काका-पुतण्याच्या भेटीमागे ‘लगीनघाई’

औरंगाबाद :  एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुण्यातील भेटीमुळे राजकीय अस्थिरतेचे चित्र निर्माण झालेले असतानाच पवारांच्या विधानामुळे अजितदादांच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार आणि आपल्या भेटीवर बोलताना पवार म्हणाले की, माझी आणि अजित पवारांची […]

Letsupp Image (83)

Letsupp Image (83)

औरंगाबाद :  एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुण्यातील भेटीमुळे राजकीय अस्थिरतेचे चित्र निर्माण झालेले असतानाच पवारांच्या विधानामुळे अजितदादांच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार आणि आपल्या भेटीवर बोलताना पवार म्हणाले की, माझी आणि अजित पवारांची भेट झाली नाही, असं नाही. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी कुठलाही कौटुंबिक प्रश्न असेल तर कुणीही मला भेटू शकते. माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे, माझा एक सल्ला घ्यायचा. त्यासाठी कुणी आलं असेल तर त्यावर अधिक काही समजयाचं कारण नाही.

https://letsupp.com/maharashtra/marathwada/ncp-chief-sharad-pawar-talk-on-dhananjay-munde-and-karuna-munde-78609.html

दोन मुलांची लग्न बाकी

पुढे बोलताना पवार म्हणाले की, अजित पवारांच्या घरात दोन मुलांची ( पार्थ आणि जय पवार) लग्न बाकी आहेत. त्यांच्या लग्नाचं काही ठरलं तर मला कुटुंबाचा प्रमुख म्हणून विचारणा होणारचं ना असे पवारांनी यावेळी म्हटले. माझ्या बहिणीची पती हे माझे विरोधक होते तर, मी काय त्यांच्याशी नातं तोडलं का? असा प्रश्नदेखील पवारांनी यावेळी उपस्थित केला.

पार्थ पवार बोहल्यावर चढणार?

शरद पवार यांच्या वरील विधानामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवारांच्या लग्नाची चर्चा सुरू असल्याचे अधोरेखित होत असून, याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तर अजितदादा आणि शरद पवारांची भेट झाली नाही ना असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

“ठाकरेंसोबत झाले ते माझ्यासोबतही होऊ शकते” : आयोगाच्या निर्णयावर पवारांनी व्यक्त केली भीती

प्लॅन बी च्या केवळ चर्चा – पवार 

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा प्लॅन बी तयार असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढण्यास सुरूवात झाली आहे. यावरदेखील पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अजित पवारांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा नसल्याचे पवारांकडून स्पष्ट करण्यात आले. या भेटीमुळे काँग्रेस आणि ठाकरेंकडून प्लॅन बी तयार करण्यात आल्याचा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी तयार असल्याच्या केवळ चर्चा असल्याचे पवारांनी सांगितले.

मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल 

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांचाच आदर्श घेतला आहे. 2024 च्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना भेटतीलच. मी पुन्हा येईन असं मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटलंय खरं पण, पण फडणवीस त्याच पदावर पुन्हा आले नाहीत, तर ते खालच्या पदावर आलेत., हे मोदींनी लक्षात घ्यावं, असा म्हणत शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version