Download App

धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या; थेट कागदपत्र देत दमानिया आक्रमक

राज्य सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केली आहे.

Anjali Damania : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दमानियांकडून नवनवीन खुलासे होत आहेत. आताही अंजली दमानिया यांनी धक्कादायक खुलासा करत मंत्री धनंजय मुंडे यांच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी केली आहे. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट लिहीली आहे. यात त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच राज्य सरकारने त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.

दमानियांनी काय सांगितलं?

अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या. वेंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजॉरिटी शेअरहोल्डर धनंजय मुंडे आणि राजश्री धनंजय मुंडे आहेत. ह्यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते. आजही ते शेअरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते? Mahagenco ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळाची wholly owned subsidiary आहे. असे असतानाही एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? मी त्यांच्या कंपनीचे काही कागदपत्रे (Annexures) खाली जोडत आहे. ज्यावर धनंजय मुंडे व राजश्री मुंडे यांची सही देखील आहे, असे दमानिया यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ; अंजली दमानियांचे पुरावे देत गंभीर आरोप

धनंजय मुंडेंची अधिवेशनाला दांडी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डीत सुरू झाले आहे. या शिबिराला पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्यांनी जमण्यास सुरुवात केली आहे. नाराज असलेल्या छगन भुजबळांनीही अधिवेशनाला हजेरी लावली आहे. परंतु, धनंजय मुंडे मात्र या अधिवेशनाला हजर राहणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. मंत्री मुंडे या शिबिराला हजर राहतील असे आधी सांगण्यात आले होते. आता मात्र नवी माहिती समोर आली आहे. या अधिवेशनाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मुंडे यांच्या कार्यालयाने दिली आहे.

follow us