सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंवर मध्यरात्री हल्ला, एकटं गाठून गाडी अडवली अन्…

Vaijnath Waghmare : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांच्यावर काल मध्यरात्री जमावाने हल्ला केला. अज्ञात इसमांनी वाघमारेंना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना बीडमध्ये घडली आहे. हल्ला कोणी केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यात सुदैवाने वाघमारे बचावले असून चांगलेच भयभीत झाले आहेत. काल […]

Untitled Design

Vaijnath Waghmare

Vaijnath Waghmare : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांच्यावर काल मध्यरात्री जमावाने हल्ला केला. अज्ञात इसमांनी वाघमारेंना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना बीडमध्ये घडली आहे. हल्ला कोणी केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यात सुदैवाने वाघमारे बचावले असून चांगलेच भयभीत झाले आहेत.

काल रात्री वैजनाथ वाघमारे त्यांच्या कारने घरी जात असताना अज्ञात इसमांनी वाघमारे यांच्यावर हल्ला केला. बीड जिल्ह्यातील केज-आडस परिसरात हा हल्ला झाला. अहमदनगर जिल्ह्यातील एक बैठक संपवून घरी जात असतांना काही हल्लेखोरांनी त्यांची गाडी रस्त्यात अडवली. आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. वाघमारे यांच्या वाहनावर जोरदार दगडफेक करण्यात आली. वाघमारे यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांचा मुलगा आणि पुतण्याही वाहनात होते. त्यामुळे या दगडफेकीत त्यांनाही मार लागला. हल्लेखोरांनी वाहनावर दगडफेक करत वाहनाच्या काचाही फोडल्या. त्यामुळं गाडीचेही नुकसान झाले आहे.

Shabana Azmi B’day: दोन लेकरांचा बाप अन् जावेद अख्तरा यांच्यासोबत लग्न; जाणून घ्या अभिनेत्रीची लव्हस्टोरी… 

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं वाघमारे यांना काही वेळ काहीच सुचले नाही. मात्र, थोड्या वेळाने हल्लेखोर पसार झाले. हा हल्ला कोणी केला? या हल्ल्यामागचे खरे कारण काय? हे अद्याप समोर येऊ शकलं नाही. मात्र, या घटनेमुळं बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे वाघमारेंनी सांगितलं. त्यांनी स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षेची मागणी करत हल्ल्याची चौकशी करावी, असं म्हटलं.

दरम्यान, वैजनाथ वाघमारे यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. वारंवार मागणी करूनही मला सुरक्षा देण्यात आली नाही. आज मला सुरक्षा असती तर हा हल्ला झाला नसता, असं म्हणत वाघमारे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता तरी वाघमारेंना सुरक्षा दिली जाते का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Exit mobile version