Download App

Ashok Chavan : आणीबाणीच्या काळापेक्षा देशातील वाईट स्थिती

नांदेड : आजची देशातील परिस्थिती पाहिली तर दररोज वातावरण बदलत चाललं आहे. कोणी मोकळ्यापणाने बोलू शकत नाही. सरकारचे गुणगाण केलं तर सगळं चांगलं आहे. सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल पण सरकारच्या विरोधात जर तुम्ही बोललात तर काही खरं नाही. आणीबाणीच्या (Emergency) काळात देखील असं घडलं नाही ते आता घडत आहे, अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ते नांदेडमध्ये (Nanded) एका कार्यक्रमात बोलत होते.

लोकांना जीवे मारण्याच्या घटना घडत आहेत. ही देशातील शोकांतिका आहे. लेखकांना गोळ्या घालण्यापर्यंतची मजल गेली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासोबत घडलेल्या घटना आपल्यासमोर आहेत. त्यांनी कधी परिणामांची परवा केली नाही. आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यामुळे त्यांना प्राण गमवावा लागला. तपास अजून सुरुच आहे. केव्हा संपेल हे काही सांगता येत नाही. लोकांचा विश्वास उडालेला आहे. यामागे कोणत्या शक्ती आहेत. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र जाणार असेल तर लोकांनी पाहायचं कोणाकडे? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे.

आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार; रुग्णालयात डॉक्टर-नर्स सुट्टीवर, आईनंच केली प्रसूती

लेखक, कवी, पत्रकार निर्भीडपणे आपली भूमिका मांडत राहतील. लोकशाही मजबूत करण्याचे काम करतील याची मला खात्री आहे, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. अनेक गोष्टी आपण पाहतो ज्या मनाला पटत नाहीत. आपल्या जे घडतं आहे हे किती उचीत आहे याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होतीय, असे अशोक चव्हाण म्हणाले.

याचे परिणार काय होत आहेत. एकीकडे सामाजिक आरोग्य खराब करायचे. लोकशाहीविरोधी धोरण स्विकारायचे. अशाप्रकारे एककल्ली कारभार देशात सुरु आहे. जर आपण काही बोललो तर आपल्याला देशद्रोही ठरवलं जाईल अशी परिस्थिती आहे, अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

Tags

follow us