मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये (Rain) मान्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात १७.८७ लाख हेक्टरची घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विभागात पेरणीचे एकूण प्रमाण सुमारे ५८ टक्के आहे.
मागील पाच वर्षांत सरासरी लागवड क्षेत्र ४९.७२ लाख हेक्टर होते. २०२५ मध्ये ४२.४२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, कृषी विभागाच्या अहवालानुसार, सध्या लागवड क्षेत्र घटून २४.५५ लाख हेक्टरवर आले आहे. मान्सूनला विलंब झाल्यामुळं, समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असं आवाहन कृषी विभागाने सुरुवातीला शेतकऱ्यांना केलं होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत, मराठवाडा विभागात यावर्षी अद्याप सरासरीइतका पाऊस झालेला नाही.
मराठवाड्यात जूनपासून अपेक्षित सरासरी पाऊस १७६ मिमी असताना, सध्या १५३.७ मिमी पावसाची नोंद झाली असून त्यात १३ टक्क्यांची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत अनुक्रमे १००.४ मिमी आणि ११२.५ मिमी या अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ६६ टक्के आणि ६६.३ टक्के इतका पाऊस होऊन लातूर आणि परभणी जिल्ह्यांत या विभागात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
कुठ किती पाऊस?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी १४.८ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ पैठण ६.७, गंगापूर ७.८, वैजापूर ५.६, कन्नड १७.४, खुलताबाद १३.५, सिल्लोड २०, सोयगाव १८.५, फुलंब्री ३०.३ मिमी पावसाची नोंदझाली. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात सरासरी २४.६ मिमी, जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक ६३ मिमी, जालना १६.५, अंबड ७, परतूर १६.१, बदनापूर २२, घनसावंगी २४.३, मंठा ८.५ मिमी पाऊस झाला.
बीड जिल्ह्यात बीड तालुक्यात सरासरी ४.५ मिमी, पाटोदा ४.८, आष्टी ६.२, गेवराई ३.५, माजलगाव ८.९, अंबाजोगाई २.७, केज ४.१, परळी १६, धारूर ११, वडवणी १०.३ मिमी पावसाची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग मिळण्यास मदत झाली आहे.
छत्रपती संभाजनगर जिल्हा
छत्रपती संभाजीनगर १५, उस्मानपुरा ३१.५, भावसिंगपूर १३, कांचनवाडी १३.५, चिकलठाण ९.३, चित्ते पिंपळगाव १३, करमाड १३.८, लाडसावंगी १७.३, लाडसावंगी १७.३, कचनेर १०.५, पंढरपूर १३.५, पिसादेवी १७, वरुडकाजी १७, आडुळ ११, बालानगर १४.५, ढोरकीन १०.८, पाचोड १०.५, आसेगाव १३, कन्नड १५.८, चापानेर १५.८, चिकलठाणा १४.३, पिशोर २३.५, नाचनवेल २३.८, चिंचोली लिंबाजी १४.५, करंजखेड २७.३, नागद १६.३, सुलतानपूर १२, बाजार सावंगी १९.५, सिल्लोड ३४.८, निल्लोड १२.८, भराडी ३४.८, गोळेगाव १८.३, आमठाणा २३.८, बोरगाव २३.८, अंभई २३.८, पालोद १८.३, सोयगाव १७.८, बनोटी ३५.५, जरांडी १७.८, फुलंब्री २६.५, आळंद ४२.३, पीरबावडा १७.५, वडोद बाजार ४२.३, बाबरा २३.
जालना जिल्हा
भोकरदन ४६.५, अनवा ११.३, पिंपळगाव रेणुकाई २४, केदारखेडा ४१, वरुड बुद्रुक ५८.५, जालना ग्रामीण ३६.५, शेवली १३.८, रोहिलागड १६.५, आष्टी २१.३, श्रीष्टी ३१.३ , दाभाडी २२, जांभबसमर्थ २४.३, पांगरी गोसावी ११.५.
बीड जिल्हा
पिंपळनेर १०.३, दौलावडगाव १२.५, नित्रुड २०.३, दिंद्रुड १९, परळी २२.५, नागापूर २२.५, शिरसाळा १३, पिंपळगाव गाडे १७.५, मोहखेड १९.८, तेलगाव १०.३,वडवणी १२.८.
