Download App

…तर कंडक्टरला पायाखालीच तुडवीन; विद्यार्थींनींच्या तक्रारीनंतर आमदार संतोष बांगर संतापले

MLA Santosh Bangar video : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) सातत्याने वादात सापडत असतात. त्यांच्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा संतोष बांगर यांचा बस कंडक्टरवरुन हिंगोली (Hingoli) आगार प्रमुखाला दम भरतानाचा व्हिडिओ समोर आलाय.

शालेय विद्यार्थींनी आणि विद्यार्थ्यांसोबत एक कंडक्टर नेहमी गैरव्यवहार करत होता. बस थांबवण्यावरुन घालून पाडून बोलत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनींनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे त्या कंडक्टरची तक्रार केली. यावरुन संतापलेल्या आमदार बांगर यांनी आगार प्रमुखाला बोलावून त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं.

हिंगोली जिल्ह्यातील शाळकरी मुली आपली तक्रार घेऊन आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात आल्या होत्या, शाळकरी विद्यार्थीही होते. त्यावेळी जमलेल्या विद्यार्थीनींनी आपली पीडा आमदार संतोष बांगर यांच्यासमोर मांडली. त्यानंतर संतोष बांगर यांनी तातडीने आगार प्रमुखांना बोलावून कंडक्टरबाबत त्यांना दम भरला. आमदार बांगर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बीडमध्ये अजितदादांची सभा होणारचं; धनुभाऊंनी ठासून सांगितलं

आमदार बांगर त्या व्हिडिओ म्हणतात की तो कंडक्टर म्हणतो, तुमच्या बापाची बस आहे का, गाडीतून खाली उतरवीन. अशा कंडक्टरला मी पायाखालीच तुडवीन, तुम्हाला कल्पना आहे, मी जेवढा चांगलाय तेवढाच खराब आहे, असे म्हणत आमदार संतोष बांगर यांनी आगार प्रमुखाला दम भरला. या घटेनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रायडर लूकमध्ये राहुल गांधी! लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले

त्या लेकराची गैरसोय झाली नाही पाहिजे, बरोबर 4.30 वाजता बस तिथं आली पाहिजे, 5 वाजेपर्यंत हे सगळे गाडीत बसले पाहिजेत. तसंच त्या मार्गावर चांगला माणूस द्या, हवं तर महिला कंडक्टर द्या किंवा एखादा बुजूर्ग माणूस द्या, असे म्हणत आमदार संतोष बांगर यांनी डेपो मॅनेजरला तंबी दिली.

Tags

follow us