Ajit Pawar : बीडमध्ये अजितदादांची सभा होणारचं; धनुभाऊंनी ठासून सांगितलं

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 08 19T163406.864

मुंबई :  शरद पवारांची बीडमधील सभा झाल्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांची 27 ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. ही सभा रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत असे ट्वीट मुंडे यांनी केले आहे.

बीडमधील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेत अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर टीका केली जाईल असे सर्वांना वाटत होते. मात्र, पवारांच्या बीडमधील सभेत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका करणे टाळण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे आता 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेत अजित पवारांसह इतर नेते काय भाषण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बीडच्या सभेत काय म्हणाले होते शरद पवार?

बीडमध्ये पार पडलेल्या शरद पवारांच्या सभेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तरुण नेत्यांनी जोरदार भाषणे केली. सर्वांनी शेरोशायरी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा बालेकिल्ला असल्याने त्यांच्यावर थेट हल्लाबोल होईल, असे बोलले जात होते. मात्र, शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते, स्थानिक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला टाळला. त्यांचे नावही भाषणात घेण्यात आले नाही. तर आमदार संदीप क्षीरसागर यांचे मात्र सर्वांनी जोरदार कौतुक केले.

राज ठाकरे घरातून निघाले ही काय ‘ब्रेकिंग न्यूज’ होऊ शकते का? गौरव सोहळ्यात पत्रकारांवरच घसरले

शरद पवार यांनी आपल्या भाषणात एक सहकारी पक्ष सोडून गेला आहे. कालपर्यंत ठीक होता. माझ्याबरोबर भवितव्य नसल्याने दुसरा नेता निवडला पाहिजे असे सांगून ते निघून गेले. माझे वय झाले आहे. तुम्ही माझं काय बघितले आहे, असा टोलाही पवारांनी अमरसिंह पंडित यांना लगावला. सामूदायिक शक्ती उभे केली तर काय होते ? हे या जिल्ह्याने दाखवून दिले आहे. ठीक आहे सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचे होते. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले आहे. त्यांच्याबद्दल माणुसकीला ठेवायची होती. आता लोक योग्य प्रकारे धडा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकारच्या कारभारावर पवारांनी जोरदार टीका केली, पण शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात्र टीका केली नाही.

‘मविआ’कडून शाहू महाराज लोकसभा लढणार? आमदार सतेज पाटलांनी स्पष्टचं सांगितलं….


आव्हाडांकडून धनंजय मुंडेंचा उल्लेख

एकीकडे शरद पवारांनी थेट अजित पवार किंवा धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका करणं जरी टाळलं असलं तरी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड भाषणादरम्यान धनंजय मुंडेंचे नाव घेतले. बीडमध्ये धनंजय मुंडेंकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवरून आव्हाडांनी धनुभाऊंवर टीका केली होती. मात्र, थेट नाव घेणं टाळलं होते. ते राष्ट्रवादीत येण्यासाठी एका वर्षापासून तयार होते. परंतु पवारांनी घेतले नाही. नाईलाजास्तव त्यांना पक्षात घ्यावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. परंतु त्यांनी मुंडेंवर थेट हल्लाबोल केला नाही. माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही आपल्या भाषणात धनंजय मुंडेंवर टीका करणे टाळल्याचे पाहिला मिळाले होते. त्यानंतर आता अजित पवार गाटाची सभा होणार असून, यात ते कोणावर निशाणा साधतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube