कुटेंचा तिरुमला ग्रुप बोत्रेंकडून टेकओव्हर ? लाखो ठेवीदारांचे काय होणार ?

Tirumala Group: ही कंपनी घेतलीय बाबूराव बोत्रे (Baburao Botre Patil) यांच्या ओंकार शुगर कंपनीने.

Tirumlla Group

Tirumlla Group

Tirumala Group: राज्यातील 28 साखर कारखाने चालविणारे ओंकार शुगरचे बाबूराव बोत्रे पाटील यांनी आणखी एक डील केलीय. ही डील एखाद्या साखर कारखान्यांबाबत नाही. ही डील तिरुमला ग्रुपबाबत असल्याचे म्हटलं जात आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष. तुम्हाला तिरुमला ग्रुपचे (Tirumala Group) सुरेश कुटे (Suresh Kute) माहिती आहे ना. तेच बीडचे ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटी चालविणारे आणि मराठवाड्यातील व इतर भागातील लाखो ठेवीदारांचे पैसे देणारे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या जेलमध्ये असलेले. आणि इकडे त्यांचे तिरुमला ऑइल कंपनी विकली गेलीय. ही कंपनी घेतलीय बाबूराव बोत्रे (Baburao Botre Patil) यांच्या ओंकार शुगर कंपनीने. आर्थिक अडचणीत आलेला उद्योग एखाद्याने टेकओव्हर करण्यात गैर काहीच नाही. पण मग तिरुमला ग्रुपला ज्ञानराधा मल्टिस्टेटने कर्जपुरवठा केलाय. मग ठेवीदारांना पैसे कसे मिळणार ? नेमकी डील काय झालीय, हेच बघूया..

ज्ञानराधा मल्टिस्टेट चालविणारा आणि तिरुमला ग्रुप चालविणारा व्यक्ती एकच आहे, सुरेश कुटे. संपूर्ण मराठवाडा, अहिल्यानगरमधील काही भागात या ज्ञानराधाचा शाखा राहिलेल्या आहेत. या बँकेत तब्बल साडेतीन हजार कोटींहून अधिक ठेवी होत्या. त्या ठेवी कुटे यांनी आपल्या कंपनीकडे वळविल्या म्हणजे थेट आपल्याच कंपनीला कर्ज दिले. हे कर्जही थोडथिडके नव्हते. म्हणजे ठेवीमधून 90 टक्के कर्ज कुटे यांनी आपल्याच तिरुमला ग्रुपला दिले होते. त्याचा आकडाही समोर आलेले आहे. आपल्याच मालकीच्या तिरुमला ग्रुपला ज्ञानराधामधून 3350 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले. तर केवळ 150 कोटी कर्ज इतरांना दिलेले आहे. बीडसारख्या दुष्काळी भागाात तिरुमला ऑईल कंपन्या उभारलेल्या. पुढे कंपन्या तोट्यात गेल्या. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी अडचणी सुरू झाल्या. एक-एक करून सगळ्या शाखा बंद झाल्या. सर्वत्र गुन्हे दाखल झाल्यानंतर बँकेचे चेअरमन सुरेश कुटे, त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना अटक करण्यात आली. त्यानुसार ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणात अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक मंडळाच्या मालमत्तांवर एमपीआयडी (MPID) कायद्यानुसार मोठी जप्ती आणि लिलावाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बीड न्यायालयातच्या परवानगी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

एनसीएलटीकडून व्यवहार
दुसरीकडे दिल्लीतील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणा (एनसीएलटीकडून) काही मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहेत. यात ओंकार समुहाचे बाबूराव बोत्रे पाटील यांनी एंट्री घेतल्याचे बोलले जात आहे. ओंकार ग्रुपने हा तिरुमला ग्रुप घेतल्याचे बोलले जात तिरुमला ऑईल, तिरुमला डेअरी, तिरुमला रिफायनरी आदी चार प्रकल्पांची एनसीएलटी मार्फत लिलाव करण्यात आला. या मालमत्ता (यंत्रसामुग्री) ओंकार समुहाचे बाबुराव बोत्रे पाटलांनी घेतल्याची माहिती आहे.


इतर बँकांचे तिरुमलावर कर्ज मग ठेवीदारांचे काय ?

तिरुमला ग्रुपवर केवळ ज्ञानराधा बँकेचे कर्ज नाही. तर खासगी बँका, इतर वित्तय संस्थांचेही कर्ज आहेत. त्यामुळे एनसीएलटीकडून तिरुमला ग्रुपच्या मालमत्तेची विक्री झाल्यानंतर हे पैसे खासगी बँका, वित्तय संस्था घेतली. मग ज्ञानराधा ठेवीदारांचे काय होणार आहे, हे अनेक प्रश्न आता निर्माण होणार आहे. एमपीआयडी कायदा आणि एनसीएलटी या दोन्हीमध्ये मात्र ठेवीदार भरडले जातील, अशी तरी परिस्थिती सध्या आहे.

Exit mobile version