Uddhav Thackeray On PM Modi : मला मोदींनी डोळा मारलाय पण मी जाणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) पंतप्रधान नरेंद्र मोदींची ( PM Modi ) ऑफर नाकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एनडीएसोबत येण्याचं आवाहन केले होते. मात्र मला मोदींनी डोळा मारलाय पण मी जाणार नाही. माझा महाराष्ट्र लुटणाऱ्यांसोबत मी जाणार नाही. असं म्हणत मोदींची ऑफर नाकारली.
Lok Sabhe Election मतदानासाठी कामगारांना मिळणार पगारी सुट्टी; कामगार उपायुक्तांचे निर्देश
जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभा रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजी नगरमधून मतदारांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, अचानक आलेल्या पावसामुळे हेलिकॉप्टर उडणे शक्य नव्हते. म्हणून जालना दौरा रद्द केला. मी जालनाकारांची माफी मागतो.
Lok Sabha Election: शरद पवारांचं दुकान बंद पडू लागलंय, त्यामुळेच…, देवेंद्र फडणवीस यांची कठोर टीका
उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी आज शहेंशाहसारखे फिरत आहे, मोदीजी तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनतेत या.. सगळीकडे कडेकोट बंदोबस्त आहे, एअर स्पेस बंद आहे, सगळीकडे पोलीस आहे. तुम्ही माझा पक्ष पळवला, चिन्ह चोरले, माणसे फोडली मात्र तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, एकीकडे मोदीजी म्हणतात तुमची शिवसेना नकली आहे, शरद पवारांची नकली राष्ट्रवादी आहे तर दुसरीकडे म्हणायचं आजा मेरी गाडी मे बैठ जा, आता पवारांना डोळा मारतायत. मोदीजी तुमचं सगळं फसवं आहे, तुम्ही फक्त फसवतात, तुमच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाके आहेत.. आता हे इंजिन पुन्हा गुजरातला पाठवायचे आहे. तुम्ही २०१४ मध्ये युती तोडली, आमचं चुकलं २०१९ मध्ये आम्ही युती तोडणार होतो असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.