Santosh Deshmukh Murder Case : राज्यात सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना सीआयडीने ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. अशातच वाल्मिक कराडांसह सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची याचिका वकिलांकडून दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयात दाखल केलेली ही याचिका आज मंगळवारी मागे घेण्यात आलीयं. या याचिकेसंदर्भातील संवादाची रेकॉर्डिंग क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि वकीलांचं संभाषण आहे.
हत्या झालेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे वकील सोमनाथकुमार साळुंकेंवर संताप व्यक्त करत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची लेट्सअप पुष्टी करत नाही. #SantoshDeshmukh #BeedHatyakand #BeedCrime pic.twitter.com/uSVQhubULW
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 7, 2025
धनंजय देशमुख आणि उच्च न्यायालयाचे वकील सोमनाथकुमार साळुंके यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये देशमुख वकील साळंके
यांच्यावर संताप व्यक्त करीत आहे. देशमुखांच्या संतापावर वकील साळुंके माफी मागत असून साळुंके यांनी खोट्या सह्या करुन याचिका दाखल केल्याचा आरोप देशमुखांकडून करण्यात येत आहे.
गोदावरी कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यात येतील; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
नेमका संवाद काय?
देशमुखः तुम्ही तसं का केलं? दाखल करण्यापूर्वी मला विचारायला पाहिजे होतं
साळुंकेः दाखल करताना अॅडजस्ट करण्यासाठी केलं
देशमुखः पण तुम्ही डुप्लिकेट सह्या का केल्या? दाखल करण्यापूर्वी मला दाखवलं का नाही?
साळुंकेः अॅडजस्ट करण्यासाठी केलं
देशमुखः अॅडजस्ट कशाला करता? चुकीच्या पद्धतीने दाखल करण्याचा हेतू काय?
साळुंकेः चूक झाली माझ्याकडून..
देशमुखः माफीचा विषय नाही, पण मी यावर काय बोलू
साळुंकेः तपासयंत्रणेला अडथळा नको म्हणून मागे घेतल्याचं सांगा
देशमुखः पण तुम्ही दाखल करायची नव्हती…
दरम्यान, यासंदर्भआत अद्याप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नसून वकील साळुके म्हणाले, ही याचिका केवळ ई-फाईल केलेली होती. त्यामुळे ती मागे घेण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा डिटेलमध्ये याचिका दाखल करणार असल्याचं साळुंकेंनी स्पष्ट केलंय.