Download App

छ. संभाजीनगरमध्ये कंपनीत मध्यरात्री भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

Waluj MIDC Fire News : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात एका (Fire News) हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री तीन वाजता या आगीने रौद्ररुप धारण केले. तरी देखील 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. तर सहा कामगारांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर चार कामगारांनी बाहेर पडून कसातरी आपला जीव वाचवला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.

पिंपरी चिंचवडच्या तळवडेत फटाका गोदामाला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

अग्निशमन विभागाने दिलेल्या वाळूज एमआयडीसीत हातमोजे तयार करणार सनशाईन एंटरप्राइज हा कारखाना आहे. या कारखान्यात 200 पेक्षा जास्त कामगार काम करतात. शनिवारी मध्यरात्री कंपनीत मोठी स्फोट झाला. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती मिळण्याच्या आता धूर निघण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता कंपनीला आगीने वेढून टाकले. कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार बिहार येथील असल्याचं समजतं. या कंपनीत हातमोजे आणि जॅकेट तयार केले जात होते.

या कंपनीत आग लागल्याचे स्थानिकांनी कळवले होते. त्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरड करत होते. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे पथकही दाखल झाले. तोपर्यंत आगीला चारही बाजूंनी वेढले होते. आग वाढेपर्यंत 16 ते 18 कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. तसेच सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला भीषण आग; जीव वाचविण्यासाठी चालत्या रेल्वेतून प्रवाशांच्या उड्या 

 

follow us