Market Committee Election : राज्यभरात बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पाणाला

Market Committee Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. प्रत्येक पक्षाने आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी केली आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवले आहेत. […]

प्रचार थांबला, आता निघा! मतदारसंघाबाहेरील कार्यकर्त्यांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

प्रचार थांबला, आता निघा! मतदारसंघाबाहेरील कार्यकर्त्यांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

Market Committee Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे.

प्रत्येक पक्षाने आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी केली आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवले आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणले आहेत. अनेक ठिकाणी मात्र बाजार समित्यांमध्ये ऐनकेन प्रकारे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं त्यासाठी कट्टर विरोधकही एकत्र येताना पाहायला मिळाले आहे. याचा प्रत्यय आला राज्यात अनेक ठिकाणी आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्यातून तेथिल राजकारणात राजकीय नेत्यांनी जम बसवलेला असतो. त्यामुळे सध्या देश आणि राज्यात गावापासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे.

Market Committee election : पैसे कुणाकडूनही घ्या पण मतदान शेतकऱ्यांच्या पॅनलला करा, ‘या’ नेत्याचं अजब आवाहन

आज राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील 14 पैकी सात कृषी उत्पन्न बाजार समित्या, जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समित्या, भंडारा जिल्ह्यातील भंडारा आणि लाखनी बाजार समिती, नाशिक बाजार समिती, यासह राज्यात आज तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार होत आहे.

या कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 30 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान राज्यातील एकुण 257 निवडणुका होणार असलेल्या बाजार समित्यांपैकी काही बाजार समित्यांची निवडणुक बिनविरोध झाली आहे.

Exit mobile version