Market Committee election : पैसे कुणाकडूनही घ्या पण मतदान शेतकऱ्यांच्या पॅनलला करा, ‘या’ नेत्याचं अजब आवाहन
Harshwardhan Jadhav On Market Committee election : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर नेत्यांना आव्हान निर्माण झाले आहे. यामध्येच एका माजी आमदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या मतदारांना एक अजब आवाहन केले आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले हर्षवर्धन जाधव अस या माजी आमदाराचं नाव आहे. नुकतच त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. सध्या ते छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. या दरम्यान त्यांनी मतदारांना आवाहन करण्यासाठी एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये ते मतदारांना ‘पैसे कुणाकडूनही घ्या पण मतदान शेतकऱ्यांच्या पॅनलला करा.’ असं अजब आवाहन करताना दिसत आहेत.
Loksabha 2024 : काँग्रेससोबत जायला तयार पण राहुल गांधी चेहरा नको; BRSची भूमिका
यावर बोलताना हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मी पैसे घेऊन मतदान करू नका असं आवाहन केल्यानंतर लोकांचे मला फोन आले. आम्ही पैसे घेऊन मतदान करतो असं तुम्हाला का वाटत? आम्ही देखील ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकांमध्ये पैसे खर्च करतो. त्यामुळे आमचा नाईलाज होतो. त्यांच्या मताशी मी काही अंशी सहमत आहे असं देखील हर्षवर्धन जाधव म्हणाले.
पण मी त्यांना म्हटलो की, पैसे कुणाकडूनही घ्या पण मतदान शेतकऱ्यांच्या पॅनलला करा. कारण शेतकरी राबतो. मालाला भाव मिळेल कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट होईल या आशेवर जगतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हायचे असेल तर तुम्हाला काय कारायचं ते करा पण मतदान शेतकऱ्यांच्या पॅनलला करा. असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.