Melghat Crime Ten Day Old Baby Given Hot Iron Shocks : अंधश्रद्धेच्या नावाखाली मेळघाटात (superstition) पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना घडली आहे. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात दहा दिवसाच्या बाळाला गरम लोखंडी वस्तूने पोटावर (Melghat) चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘डंबा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली (Crime News) होती. ही घटना 15 जून रोजी घडली असून तब्बल 10 दिवसांनी तिचा पर्दाफाश झाला आहे.
‘डंबा’ देण्याचा सल्ला
प्राप्त माहितीनुसार, बाळाच्या आईची प्रसूती रुग्णालयात झाली होती. काही दिवसांनी बाळासह आईला घरी पाठवण्यात आले होते. घरी परतल्यानंतर बाळाची प्रकृती थोडी बिघडली होती. स्थानिक आरोग्य पथकाकडून प्राथमिक उपचार देखील करण्यात आले. मात्र त्यानंतर बाळाच्या आईची काकू तिच्या घरी आली. तिने बाळाच्या नाकातून पाणी गळत आहे, पोट फुगले आहे अशी तक्रार करत तातडीने ‘डंबा’ देण्याचा सल्ला दिला.
VIDEO : ‘दोन्ही भावांनी आपापसांत भांडून…’ ठाकरेंच्या युतीवर खासदार बंडू जाधव काय म्हणाले?
पोलीस ठाण्यात गुन्हा
या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बाळाच्या आईने त्यास संमती दिली. बाळाच्या पोटावर गरम लोखंडी वस्तूचे चटके देण्यात आले. या चटक्यांमुळे बाळाची प्रकृती आणखी खालावली. त्याला तातडीने अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेत एक महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
मेळघाट परिसरात अजूनही अशा प्रकारची अंधश्रद्धा खोलवर रूजलेली असल्याचे हे प्रकरण पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे. चार महिन्यांपूर्वीही एका 22 दिवसाच्या बाळावर असाच प्रकार करण्यात आला होता.
निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड सरकारी बंगला सोडेनाच; सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय
आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान
या घटनेमुळे ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे वाढते प्रमाण आणि लोकांमधील जागृतीचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध असतानाही अशा प्रकारच्या अघोरी उपचारपद्धतींचा अवलंब होत असणे ही गंभीर बाब मानली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने याविरोधात अधिक कठोर उपाययोजना राबवण्याची गरज आहे.