राणा दाम्पत्याची मेळघाटात आदिवासींसोबत अनोखी होळी
अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat)पाच दिवस चालणाऱ्या होळी (Holi)उत्सवामध्ये खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)आणि आमदार रवी राणी (MLA Ravi Rana) हे अनेक गावांमध्ये सहभागी झाले. त्यांनी आदिवासी बांधवांसोबत होळीची पारंपारिक (Traditional Holi) पद्धतीनं पूजा करून होळी पेटवली. यावेळी राणा दाम्पत्यानं उपस्थितांशी मनमोकळा संवादही साधला.
यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी संपूर्ण आदिवासी बांधवांना पर्यावरणपूरक होळीचं पूजन करून सुख-समृद्धीसाठी आदिवासी बंधू भगिनींच्या सोबत प्रार्थना केली. त्यांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणांनी धुळघाटसह पळसकुंडी, जामपाणी, बारतांडा, टेम्बुरखेडा, सावलीखेडा, डाबका, कलमखार, गोंडवाडी, चिचघाट, दीया, लवादा, चित्री आदी गावांमध्ये जाऊन होळीपूजन, रंगोत्सव, फगवा वाटप आदी कार्यक्रमात सहभागी झाले.
Abdul Sattar : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे होणार, कृषीमंत्र्यांचं अश्वासन
यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही ऐकून घेत निराकरण केलं. त्याचबरोबर मेळघाटातील या समुदायांची भेट घेण्यासाठी यावेळी राणा दाम्पत्यानं बाईक राईड केली. बाईकवरूनच ही दोघं या दौऱ्यावर निघाली आणि पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. स्वतः राणांनी तो व्हिडीओ शेअर केला होता.
त्यामध्ये त्यांनी होळी साजरा करण्यासाठी आपण मेळघाटातील खेडोपाडी गेल्याचं सांगितलं. अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं. एका व्हिडीओमध्ये ही जोडी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गप्पाही मारताना दिसली.