Mens more depressed than women In Kolhapur : महिलांचं व्यक्त होण्याचं प्रमाण पुरूषांपेक्षा जास्त असतं, असं म्हटलं जातं. साधारणपणे महिला जास्त भावूक असतात, त्या हसतात, रडतात, चिडचिड करतात. परंतु व्यक्त होता. याच्या तुलनेत पुरूष जास्त व्यक्त (Mens more depressed than women) होत नाही, आपल्या मनातील घालमेल कोणाला सांगत नाही. पुरूषांच्या याच सवयीमुळे त्यांच्यात ताणतणाव, नैराश्याचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय. राज्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये नैराश्य (Mental Health) अधिक आहे. मानसिक आरोग्यासंबंधी समस्या सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने टेलिमानस ही हेल्पलाईन सुरू (Depression Report) केलीय. या हेल्पलाईनवर मदतीसाठी येणारे कॉल…हे महिलांच्या तुलनेत पुरूषांचे दुप्पट कॉल असतात.
Devmanus Movie : देवमाणूस चित्रपटातलं ‘पांडुरंग’ भक्तीगीत प्रेक्षकांच्या भेटीला…
नेमकी कोणती आकडेवारी समोर आली?
राज्यात नैराश्येसंदर्भात समोपदेश करणाऱ्या या हेल्पलाइनवर मदतीसाठी आलेल्या एकूण कॉल्सपैकी 67.99 टक्के कॉल पुरुषांनी केलेत. तर महिलांनी केलेल्या कॉलची टक्केवारी केवळ 31.50 प्रमाण आहे. तर 0.012 टक्के पारलिंगी व्यक्तींनी देखील मदतीसाठी संपर्क केला, असं विश्लेषणात नमूद करण्यात आलंय. तर आलेल्या कॉल्सपैकी 71 टक्के कॉल 18 ते 45 वयोगटातील आहे. मदत करण्यासाठी, समुपदेशनासाठी त्यांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधला, असं उपलब्ध माहितीद्वारे स्पष्ट झालंय.
कामाची बातमी! राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’; घरात बसून करता येणार रजिस्ट्री
फोन कशासाठी येतात?
नैराश्य, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा, झोपेच्या तक्रारी यासाठी काय करावे, या कारणांसाठी फोन जास्त येत होते. चिंता, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध, कामाचा ताणतणाव, चिडचिडेपणा, एकटेपणा, वर्तणुकीतील बदल, झोप न येणे, अतिविचार, व्यसनाधीनता या समस्यांसाठी सर्वाधिक फोन येतात, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. यामध्ये दहापैकी सात पुरुषांनी, तर तीन महिलांनी या हेल्पलाइनवर मानसिक अनारोग्यासंबंधी मदत मागितली. कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधांच्या तक्रारी अशा प्रकरणांची संख्या या कॉलमध्ये सर्वाधिक आहे.
‘या’ शहरातील पुरुष सर्वाधिक निराश
राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातून नैराश्येसंदर्भातील समोपदेशनासाठी सर्वाधिक कॉल आले आहेत. तर या यादीत मुंबई तिसऱ्या क्रमाकांवर आहे. संस्कृतिक राजधानीचं शहर असलेलं पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून 1 लाख 45 हजार 431 कॉल्स या केंद्रावर आलेत. त्यापैकी 85 हजार 650 कॉलचे विश्लेषण केले असता, मदतीसाठी 87.86 टक्के व्यक्तींनी विचारणा केलीय. आपत्कालीन स्थितीत 0.973 टक्के व्यक्तींनी फोन केल्याचं या अहवालात समोर आलं. तसंच विनाकारण कॉलची संख्या 3.6 टक्के असल्याचं स्पष्ट झालंय. या आकडेवारीवरुन केवळ शहरी भागांत पुरुषांना नैराश्येचा सामना करावा लागतो, हा समज कुठेतरी चुकीचा ठरताना दिसत आहे.
पुरूषांमध्ये नैराश्य का वाढतंय?
सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांमध्ये वाढ झाली की, याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळं मन अस्वथ होतं…किंवा सतत चिंता निर्माण होते. सामाजिक अपेक्षा, ताण, आर्थिक समस्या, आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याची भीती, ही देखील पुरूषांच्या नैराश्याची काही कारणे आहेत. तर वाढलेल्या चिंतेचे प्रमाण शारीरिक आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरते अन् व्यक्ती नैराश्यात जातो, असं डॉक्टर सांगतात. कौटुंबिक कारणे, आणि वैवाहिक जीवनातील कलह, आणि कामाचा ताण ही देखील काही कारणे समोर आली आहेत.