आता दूध डेअऱ्या, दूध संघ तुकाराम मुंढेंच्या रडारवर! ‘सेव्ह फुड, सेव्ह ड्रग’ मोहिम हाती घेत थेट कारवाईचा इशारा

Milk dairies on Tukaram Mundhe's radar राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सेव्ह फूड, सेव्ह ड्रग' ही मोहीम सुरू केली आहे.

Milk Dairies On Tukaram Mundhe's Radar

Milk Dairies On Tukaram Mundhe's Radar

Milk dairies and milk unions on Tukaram Mundhe’s radar Launching ‘Save Food, Save Drug’ campaign warned of direct action : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा मोहिमेला आणखी गती दिली असून आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला आहे. हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांवरील कारवाईनंतर आता दूध संकलनापासून ग्राहकांच्या ताटापर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीवर कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. यासाठी ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शिरूर बाजार समिती निवडणूक : दिलीप वळसे पाटील व अशोक पवार आमने-सामने

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, दूध हा नागरिकांच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दूध उत्पादकांशी बैठक घेऊन त्यांना नवीन नियमांची माहिती देण्यात आली असून, ‘फार्म टू प्लेट’ म्हणजेच उत्पादनापासून ग्राहकांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

422 ग्रॅम सोने अन् 1.5 कोटींची कॅश ; अकोलाच्या लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात आणखी काय- काय?

मुंढे यांनी सांगितले की, दुधातील भेसळ, कृत्रिम दूध तयार करणे आणि अस्वच्छ पद्धतीने उत्पादन किंवा विक्री होण्यापासून रोखण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दूध उत्पादक, पॅकिंग करणारे, वाहतूकदार, वितरक आणि विक्रेते अशा सर्व संबंधित घटकांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

अहिल्यानगरला 3 व 4 जुलैला ‘येलो अलर्ट’! वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, प्रशासनाचे दक्षतेचे आवाहन

दूध संकलन केंद्रे, शीतकरण केंद्रे, मोठ्या प्रमाणात दूध विक्री करणारे व्यापारी, तसेच पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज आणि आइस्क्रीम उत्पादक व विक्रेते यांनाही या नियमांच्या कक्षेत आणण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.

राम मंदिर देणगी प्रकरणावरून ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; 5 जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन करणार

यापूर्वी हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा उल्लेख करताना मुंढे म्हणाले की, अनेक आस्थापनांनी आवश्यक सुधारणा केल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी प्रत्यक्षात कीटकनाशक फवारणी (पेस्ट कंट्रोल) न करता केवळ बनावट प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याचे आढळले. अशा प्रकरणांमध्ये संबंधित आस्थापनांवर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. केवळ कागदोपत्री पूर्तता न करता प्रत्यक्ष नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

लग्नसराईच्या तोंडावर काश्मीरमध्ये मटण संकट गडद; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी पंजाब सरकारकडे घेतली धाव

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या संकलन, शीतकरण, प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री या संपूर्ण प्रक्रियेत अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी बंधनकारक असेल. या उपक्रमाचा उद्देश भेसळ रोखण्याबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे, प्रामाणिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात अन्न सुरक्षेची सक्षम व्यवस्था निर्माण करणे हा आहे.

दूध पुरवठा साखळीत आढळल्या अनेक गंभीर त्रुटी

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर केलेल्या तपासणीत दूध पुरवठा साखळीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये :

या पार्श्वभूमीवर राज्यभर एकसमान अन्न सुरक्षा प्रणाली प्रभावीपणे राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version