Download App

मराठ्यांनाच सर्वाधिक प्रतिनिधित्व; 5105 कोटीही वितरीत : आकडेवारी सांगत भुजबळांचा हल्लाबोल

हिंगोली : 10 टक्के आर्थिक निकषावर आरक्षण आहे. त्याअंतर्गत वेगवेगळ्या अभ्यासक्रमात 78 टक्के मराठा समाज आहे, उर्वरित 40 टक्क्यातही मराठा समाज आहे, आता आमच्या 27 टक्के आरक्षणातही मराठा समाज येत आहे, असा हल्लाबोल मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. हिंगोलीमध्ये त्यांच्या नेतृत्वात जालनानंतर दुसरी ओबीसी (OBC) एल्गार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. (Minister and OBC leader Chhagan Bhujbal claimed that Maratha community has got maximum representation)

यावेळी भुजबळ यांनी आकडेवारी सांगत मराठा समाजाला सर्वात जास्त प्रतिनिधित्व असल्याचा दावा केला. ते म्हणाले, सरकारी नोकऱ्यांमध्येही मराठा समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व आहे. 15 टक्के आयएएस, 28 टक्के आयपीएस, 18 टक्के फॉरेन सर्व्हिस, मंत्रालयात अ गट – 37.5 टक्के, ब गट – 52.5 टक्के, क गट – 52 टक्के आणि ड गटात – 55 टक्के लोक आहेत. ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण आहे. पण आजही सरकारी नोकरीत आकडेवारीनुसार, 1 लाख 30 हजार जागांचा अनुशेष आहे.

आतापर्यंतच्या कुणबी नोंदी स्थगित करा अन् शिंदे समिती बरखास्त करा : भुजबळांची सर्वात मोठी मागणी

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाने आतापर्यंत 5 हजार 105 कोटी रुपये वितरीत केले. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचे 2 लाख 13 हजार लाभार्थी आहेत. पण त्याचवेळी ओबीसी महामंडळाला एक हजार कोटीही नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला मिळाले ते ओबीसी महामंडळाला आणि महाज्योतीलाही मिळाले पाहिजे अशी मागणीही भुजबळ यांनी केली.

माजी न्यायमूर्ती शिंदेंची समिती रद्द करा :

माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, त्यांना काहीही अधिकार नाही. आधी म्हणाले पाच हजार नोंदी सापडल्या, मग म्हणाले साडे अकरा हजार, मग साडे तेरा हजार, मग लाख, दोन लाख, एक कोटी अशा नोंदी सापडल्या. या सर्व कुणबी नोंदींना आणि प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. हे चालणार नाही, अशी मोठी मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली आहे.

छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका, ओबीसी-मराठा वादाला हिंगोलीतून फोडणी?

स्वतः समर्थनार्थ पुढे या :

छगन भुजबळ यांनी यावेळी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना पाठिंबा द्यायला स्वतःहुन पुढे येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “माझी सर्वपक्षीय नेत्यांना विनंती आहे, अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवली जात नाही. ज्यांचा जमीर जिंदा आहे ते स्वत:समर्थनात पुढे येतात. अगर आप जिंदा हो तो जिंदा आणा भी जरुरी है. आपल्या अधिकारावर गदा येत असेल तर विरोध करायला हवा, असेही ते म्हणाले.

Tags

follow us