Download App

‘माझा गैरसमज कोकाटेंनी दूर करावा’; भुजबळांचा थेट इशारा, पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर?

Chhagan Bhujbal Statement On Manikrao Kokate: नाशिक जिल्हा बँकेवरून (Nashik District Bank) महाराष्ट्रात सध्या वातावरण तापत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी माणिकराव कोकाटे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. माझा नेहमीच गैरसमज होतो, तो त्यांनीच दूर करावा, असं म्हणत त्यांनी कोकाटेंकडे (Manikrao Kokate) थेट जबाबदारी सोपवली. नाशिक जिल्हा बँकेबाबत जे काही प्रश्न उपस्थित होतात, त्यावर सुस्पष्ट उत्तरं मिळणं गरजेचं आहे. ही बँक एकेकाळी महाराष्ट्रातील नंबर वन बँक होती. आज ती कुणामुळे बुडाली हे सर्वांनाच माहिती आहे. ज्यांना अधिक माहिती असेल त्यांनी ती पुढे आणावी.

भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, मी स्वतः कधीही जिल्हा बँकेचा संचालक नव्हतो. त्यामुळे बँकेच्या कारभाराशी माझा थेट संबंध नव्हता. सध्या अजित पवार स्वतः यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळे व्यवस्थापन सुधारण्याची शक्यता आहे. यापूर्वी कोकाटेंनी भुजबळांवर अप्रत्यक्ष आरोप करत काही वक्तव्य केल्याची चर्चा रंगली होती. त्यावरूनच भुजबळांनी ही प्रतिक्रिया देत, आपण कोकाटेंविषयी वैयक्तिक आकस न ठेवता केवळ वस्तुस्थिती मांडल्याचं सांगितलं. परंतु यामुळे अजित पवारांच्या पक्षातील अंतर्गत संघर्ष मात्र चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय.

VIDEO: चांदबिबी महाल भागात पुन्हा बिबट्या दिसला; नागरिकांनो सावध राहा !

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण पडतोय. परंतु यात लपवण्यासारखं काही नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे मत मांडले. ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी म्हटलंय की, या योजनेमुळे इतर योजनांवर आर्थिक ताण येतोय, पण यात लपवण्यासारखं काहीच नाही. सरकारकडे त्या योजनेसाठी शिल्लक निधी नव्हता. शिवभोजन थाळीसारख्या योजनांचाही निधी थांबलेला आहे. मात्र कुणाचाही पैसा कुठे जाणार नाही. सरकार सर्वांना देणे देणार आहे, असं देखील भुजबळ यांनी ठामपणे सांगितलं.

“मला PM मोदींचा फोन आला म्हणाले, मराठी बोलू हिंदीत अन् पुढे..”, उज्ज्वल निकमांनी सांगितला खास किस्सा

नवीन लोकांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वबदलाबद्दल बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्या निर्णयाचं समर्थन केलं. ते सात वर्षं प्रदेशाध्यक्ष होते. नवीन लोकांना संधी मिळावी म्हणून त्यांनी पद सोडलं असावं, असं छगन भुजबळ यांनी नमूद केलं. वेगवेगळ्या वाटांनी गेलेल्या लोकांनी आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. शरद पवार पुन्हा कबड्डीमध्ये लक्ष घालणार असतील, तर ती चांगली गोष्ट आहे, असंही भुजबळ यांनी म्हटलंय.

निधीच्या वापराबाबत सरकारची भूमिका

रोहित पवारांवरील आरोपांवर भुजबळ म्हणाले, तो आरोप आहे. ते त्यावर काय उत्तर देतात हे बघावं लागेल.” बीड मारहाण प्रकरणी कायद्याचे अधिकारी आहेत, काय करायचं हे त्यांना माहिती आहे. माणिकराव कोकाटे आणि जिल्हा बँकेच्या विषयावर भुजबळ म्हणाले, माझा गैरसमज झाला असेल, त्यांनी तो दूर करावा. मी संचालक नव्हतो. जिल्हा बँकेत स्वत: अजित पवार लक्ष घालत आहेत. छगन भुजबळ यांनी संपूर्ण संवादात स्पष्टपणा ठेवत आपल्यावर झालेले आरोप, निधीच्या वापराबाबत सरकारची भूमिका, तसेच पक्षातील अंतर्गत घडामोडींवर सूचक भाष्य केलं.

 

follow us