Chhagan Bhujbal On Maratha Reservation: मराठा समाजाचा विजय झालंय अस तूर्त वाटतंय. परंतु झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही. हे एक सूचना आहे,याचे रूपांतर नंतर होणार आहे. यावर हरकती मागवण्यात आले आहे. (Maratha Reservation ) ओबीसी आणि इतर समाजाच्या आणि तज्ञांचे हरकती मागवल्या आहेत. सगळ्यांनी यावर हरकती पाठवाव्या. समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही हरकती घेऊ.असे शिंदे सरकारचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे.
सगेसोयरे जे आहेत ते कायदाच्या चौकटीत टिकणार नाही. ओबीसी च्या 17 टक्के मध्ये सगळेच येतील. ews आणि open मध्ये जे आरक्षण मिळत होते ते आता मिळणार नाही ओबीसी ला धक्का लागणार नाही असे म्हणत बॅकडोर एन्ट्री ने तुम्ही येत आहात. ओबीसी वर अन्याय केला जातोय का? मराठ्यांना फसवले जात आहे यावर अभ्यास करावा लागेल, असे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
Maratha Reservation : ‘मनोज जरांगे लढ्यात जिंकले पण, तहात हरले’; ओबीसी नेत्याने स्पष्टच सांगितलं
सरसकट गुन्हे मागे घ्या हा नियम यापुढे सर्वानाच लागू होईल का? मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फक्त मोफत शिक्षण का? सगळ्यांनाच मोफत द्या.उद्या याबाबत संध्याकाळी 5 वाजता मी माझ्या मुंबईतील निवास्थानवर बैठक घेऊन चर्चा करणार आहोत, हा अध्यादेश नाही नोटिफेकेशनचा मसुदा आहे. असे यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.
जरांगे पाटील यांच्या ‘या’ मागण्या मान्य
-ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला लागू केल्या जाणार तसेच 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मिळणार.
-मराठवाड्यात नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाणार.
-वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार.
-अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार.