Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाचे श्रीकृष्ण, शकुनीला चिलटासारखं चिरडणार; पडळकरांचा जरांगेंवर थेट हल्ला

Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाचे श्रीकृष्ण, शकुनीला चिलटासारखं चिरडणार;  पडळकरांचा जरांगेंवर थेट हल्ला

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे श्रीकृष्ण असल्याची तुलना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते बीडमध्ये ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यामध्ये बोलत होते. ते म्हणाले की, वंजारी आणि धनगर समाज हा राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक आहेत तर त्यावर रथाच सारथ्य करणारे महात्मा फुलेंचे विचारांचे नेते छगन भुजबळ हे श्रीकृष्ण आहेत.

लोकसभेची मोर्चेबांधणी! नगरमध्ये उद्या महायुतीचा मेळावा, नेत्यांनी लोकसभेसाठी फुंकले रणशिंग

यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, धनगर आणि वंजारी समाजाचे एक सामाजिक नात आहे. वंजारी समाजाचे संत भगवान बाबा आणि धनगर समाजाचे संत बाळूमामा हे दोघेही पंढरीचे पांडुरंगाचे भक्त होते. त्यांची नक्की भेट झाली असणार. त्यांनी विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली असणार. त्यामुळे वंजारी आणि धनगर समाज हा राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा आरक्षणाच्या रथाची दोन चाक आहेत. तर त्यावर रथाच सारथ्य करणारे महात्मा फुलेंचे विचारांचे नेते छगन भुजबळ हे श्रीकृष्ण असल्याची तुलना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

ओबीसी मेळाव्यात भाषण थांबवत महादेव जानकरांनी धरले भुजबळांचे पाय, म्हणाले, ‘तुम्हाला मुख्यमंत्री….’

तसेच यावेळी पडळकर यांनी जरांगेंवर देखील निशाणा साधला ते म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं महाभारत हे ओबीसी समाजात जिंकणार. कारण माळी, धनगर, वंजारी, भटके विमुक्त आणि ओबीसी हे पाच पांडव हे एकत्र आहेत. त्यामुळे कुठलाही शकुनी समोर आला तरी त्याला चिलटा सारखं चिरडल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत पडळकर यांनी जरांगेंना शकुनी म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

Devendra Fadanvis : परदेश दौरा ते OSD च्या कंपनीपर्यंत; रोहित पवारांच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर ठाम आहेत. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगेंच्या विरोधात उतरले आहेत. आजही बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात बोलतांना भुजबळांनी जरांगेवर जोरदार निशाणा साधला. तर यावेळी सभेला संबोधित करतांना महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाषण थांबवून छगन भुजबळांचे आशीर्वाद घेतले. जानकर म्हणाले की, गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत. गोपीनाथ मुंडेंनी मला मानसपुत्र मानलं होतं. मुंडे साहेब आज हयात नाहीत. पण, छगन भुजबळ जिवंत आहेत. भुजबळ साहेब तुम्हाला मुंडेची जागा भरून काढायची आहे. नो कॉंग्रेस, नो बीजपी, आम्ही तुमच्याकडे वडीलधारे म्हणून पाहतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube