Chhagan Bhujbal : छगन भुजबळ गो बॅक! घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रस्त्यावर शिंपडलं गोमूत्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ गो बॅक! घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रस्त्यावर शिंपडलं गोमूत्र

Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केला आहे. सातबारा आमचा त्यामुळे आमच्या बांधावर येऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत सुनावले. तसेच काही ठिकाणी भुजबळांच्या ताफ्याला ग्रामस्थांनी काळे झेंडेही दाखवले. त्यानंतर आता आणखी एक बातमी समोर आली आहे. छगन भुजबळ यांचा ताफा जात असलेल्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं. तसेच भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. येवल्याच्या सोमठानदेश गावातील ज्या मार्गावरून भुजबळांच्या वाहनांचा ताफा गेला त्या रस्त्यावर आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं.

Chhagan Bhujabl : मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही; रोहित पवारांच्या ‘त्या’आरोपांवर भुजबळांचं प्रत्युत्तर

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज याच नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ करत आहेत. मात्र या दौऱ्यात त्यांना ठिकठिकाणी मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी आंदोलने करत भुजबळांचा निषेध नोंदवला जात आहे. छगन भुजबळांचा दौरा संपल्यानंतर ते ज्या रस्त्याने परत फिरले. त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडण्यात आलं. आंदोलकांनी भुजबळ गो बॅकच्या जोरदार घोषणाही यावेळी दिल्या.

लासगावातील कोटमगाव रेल्वे पूल परिसरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ गो बॅकचे फलक हातात घेऊन आंदोलन केले जात आहे. येथील भिंतीवर पोस्टर्सही चिटकवण्यात आले आहेत. येथील रस्त्याचं आणि पाण्याचं काम होत नसल्याने लोक नाराज झाले आहेत. नुसती आश्वासनं देऊ नका तर कामं करा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी भुजबळांच्या वाहनांचा ताफा अडवत त्यांना निवेदन दिले. दौऱ्याला वाढत असलेला विरोध पाहता भुजबळांनी हा दौरा आटोपता घेतला.

आताच्या कुणबी नोंदी खडाखोडी करुन शोधल्या : छगन भुजबळांचा शिंदे समितीवर मोठा आरोप

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube