Manoj Jarange : ‘राजीनामा द्यायला सुद्धा मोठं मन लागतं’; जरागेंनी भुजबळांना डिवचलं

Manoj Jarange : ‘राजीनामा द्यायला सुद्धा मोठं मन लागतं’; जरागेंनी भुजबळांना डिवचलं

Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी नेतेही आले आहेत. या मुद्द्यावर भुजबळांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. महाशक्तीने सांगितले तर राजीनामाही देतो असे भुजबळ काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार केला. राजीनामा द्यायला सुद्धा मोठं मन लागतं, असे म्हणत त्यांनी भुजबळांना पुन्हा डिवचले.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता प्रकृती बरी आहे. आता मी पुन्हा अंतरवली सराटीला निघालो आहे. 1 डिसेंबरपासून पुन्हा दौरा सुरू करणार आहे. हा दौरा 12 डिसेंबरपर्यंत सुरू असेल. त्याआधी जालन्यात जाहीर सभा घेणार आहोत. या सभेची तयारीचे काम सुरू आहे असे जरांगे पाटील म्हणाले.  यानंंतर पत्रकारांनी त्यांना भुजबळांच्या राजीनाम्याबाबत विचारले. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले.

Manoj Jarange : ‘आमच्याच लोकांना अटक, यामागे सरकारचा कोणता डाव?’ जरांगेंचा थेट सवाल

राजीनामा द्यायला मोठं मन लागतं. हे पदाला चिटकून बसणारे लोक आहेत. मराठ्यांविषयी गरळ ओकणारे हे लोक आहेत. अशा लोकांना आम्ही काय सल्ला देणार. त्यांचं ते पाहतील. कायद्याच्या पदावर बसून कायदा सुव्यवस्था बिघडवायची. जातीजातीत भेद करायचा. पदाचा गैरवापर करायचा. अशा लोकांना आम्ही महत्वच देत नाही. ते खूप मोठे आहेत त्यांना सल्ला देण्याइतके आम्ही मोठे नाहीत, असे जरांगे पाटील म्हणाले.

8 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू 

दोन दिवसांपूर्वी सरकारचे लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की 8 तारखेपर्यंत थांबा. तेव्हा आता आम्ही 8 तारखेपर्यंत वाट पाहू. जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या म्हणजे मगे ते टिकवण्याचीही गरज राहणार नाही. आता सबुरीनं घ्या असे पटेल म्हणतात तर माझं त्यांना सांगणं आहे की आधी तुमचे लोकं थांबवा ते जास्त फडफड करायला लागले आहेत. त्यांना थांबवा मग आम्हीही थांबतो. तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा तुमचा सल्ला आम्ही ऐकतो.

Chhagan Bhujbal : ‘नवी वर्णव्यवस्था येतेय, लायकी काढली जाते’ भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube