Chhagan Bhujbal : ‘नवी वर्णव्यवस्था येतेय, लायकी काढली जाते’; भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

Chhagan Bhujbal : ‘नवी वर्णव्यवस्था येतेय, लायकी काढली जाते’; भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

Chhagan Bhujbal : राज्यात आता नवीन वर्णव्यवस्था उदयास येत आहे. ही वर्णव्यवस्था वेगळी. आधीची वर्णव्यवस्था वेगळी होती. आता थेट लायकी काढली जात आहे. अशा शब्दांत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. भुजबळ पुढे म्हणाले,काही दिवसांपूर्वी वाटलं होतं की आता वर्णव्यवस्था संपली. पण उषःकाल होता होता काळरात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे स्पष्ट करत मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. विरोधात असू शकतही नाही. सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. कुणावरही अन्याय होता कामा नये. पण जर अन्याय होत असेल तर सहन देखील करता कामा नये.

Manoj Jarange : ‘आमच्याच लोकांना अटक, यामागे सरकारचा कोणता डाव?’ जरांगेंचा थेट सवाल

राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपीटीनेही पिके जमीनदोस्त झाली आहेत. यावरही भुजबळ यांनी भाष्य केले. आज वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली पावसाने अवकळा. आधी पाणी नव्हतं आता पाऊस पडला तो इतका की सगळ्या पिकांचं वाटोळं झालं. पण या संकटाच्या काळात सरकार आवश्यक ती सगळी मदत करेल असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.

पुण्यातील फुले वाड्याची जागा वाढविण्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी अनेक अडचणी आहेत. 50 ते 100 कोटींमध्ये काम पूर्ण होईल. महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार या दोघांनीही लवकरात लवकर काम पू्र्ण करू असं आश्वासनि दिलं आहे. काम झालं नाही तर आंदोलन करू, उपोषण करू पण असे विचार मनात येण्याअगोदर काम होईल. पण, प्रत्येक प्रश्नासाठी लढायचं असेल तर लढू असेही भुजबळ म्हणाले.

मी माझे शब्द मागे घेतो! ‘लायकी’च्या विधानानंतर मनोज जरांगेंनी मागितली माफी 

मनोज जरांगेंनी शब्द मागे घेतले

जाहीर सभेत जनतेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी मराठा वगळत इतरांना लायकी नसल्याची उपमा दिल्याचा आरोप करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यावरुन मनोज जरांगे यांनी मी माझे शब्द मागे घेत असल्याचं म्हणत दिलगिरी व्यक्त केली. मनोज जरांगे म्हणाले, माझा म्हणायचा उद्देश तसा नव्हता, वेगळा होता. पण विनाकारण त्याला जातीकडं ओढण्याचा प्रयत्न करायला लागले. काहींनी त्या शब्दाचा विनाकारण गैरसमज केला तर काहींनी राजकीय स्वार्थापोटी त्या शब्दाचा अर्थ वेगळा जोडून त्याला जातीय रंग देण्याकडं ओढलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube