Manoj Jarange : ‘आमच्याच लोकांना अटक, यामागे सरकारचा कोणता डाव?’ जरांगेंचा थेट सवाल

Manoj Jarange : ‘आमच्याच लोकांना अटक, यामागे सरकारचा कोणता डाव?’ जरांगेंचा थेट सवाल

Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली सराटी येथील दगडफेक प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारच्या हेतूवरही त्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने आमच्याच काही लोकांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेचे कारण काय? सरकारचा यामागे कोणता डाव आहे? असे सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केले आहेत. छगन भुजबळ गप्प राहिले तर आम्हीही गप्प राहू असेही जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Manoj Jarange यांचं आरक्षणावरच लक्ष विचलित झालंय; सुषमा अंधारेंनी जरांगेंनाच सुनावलं

जरांगे पाटील पुढे म्हणाले, अंतरवलीतले कार्यकर्ते अटक करणार नाही असं सरकारनं सांगितलं होतं. मग आमचे लोक अटक करण्यात काय कारण आहे. आमचे लोक अटक करून आम्हाला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे का. आमचे कार्यकर्ते अटक केले जाणार नाहीत तरी देखील सरकारने ही कारवाई केली यावरून या पाठीमागे काहीतरी डाव आहे हे स्पष्ट होत आहे. अटक करण्याची भूमिका जर नव्हती तर मग अटक का केली, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी विचारला. या प्रकरणाची अधिकृत माहिती घेतली की यावर बोलेन. अवघ्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आमचे आहेत. समाजाला न्याय देण्यासाठीच मराठा समाज एकवटला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छगन भुजबळांवर जोरदार टीका 

यानंतर जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. छगन भुजबळ यांनी आमच्या आरक्षणास विरोध करण्यास सुरुवात केली. ते आमच्यावर काहीही आरोप करत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना उत्तर द्यावे लागत आहे. आम्ही त्यांना कोणताही त्रास दिला नाही. त्यांनी बोलणे बंद केले तर आम्हीही बोलणे बंद करू असे जरांगे पाटील म्हणाले.

Maratha Reservation: आंदोलनामागे कोण हे शोधून काढावे; मनोज जरांगेंचे राज ठाकरेंना थेट चॅलेंज

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे (Jalna News) मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या (Maratha Reservation) उपोषणाच्या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांत वाद होऊन लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता या घटनेत मोठी माहिती समोर आली आहे. या दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याला अंबड पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. एक गावठी पिस्तू आणि दोन जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत. बेदरे आणखी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube