राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… तरूणांच्या नोकऱ्यांवरून गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य

Minister Gulabrao Patil यांनी मराठी तरूणांवर नोकऱ्या करण्याच्या मानसिकतेवरून फटकारले.   त्यांच्या या विधानावरून ते आता टीकेचे धनी होणार.

Gulabrao Patil

Gulabrao Patil

Minister Gulabrao Patil Contervercial Statement about Maharashtra Yuth Employment : राज्यामध्ये आणि विशेषत: मुंबईमध्ये मराठी तरूणांच्या नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून बिहारी लोकांना आश्रय देणाऱ्या नेत्यांच्या धोरणावर आणि परप्रांतीय लोकांवर टीका केली जाते. यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील मराठी तरूणांवर नोकऱ्या करण्याच्या मानसिकतेवरून फटकारले आहे. तसेच यावेळी त्यांनी आपल्या या वक्तव्याचा तरूणांना राग आला तरी चालेल. कारण आता निवडणुका थेट 4 वर्षांनी आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केलं.  त्यांच्या या विधानावरून ते आता टीकेचे धनी होणार एवढं नक्की.

नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?

हजार मुलं नोकरीला लावले. त्यातील 800 मुलं निघून गेले. नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे असं म्हटलं जातं. मात्र नोकऱ्या आहेत करणाऱ्यांची मानसिकता नाही. जे बिहारी लोक येथे येऊन पोट भरतात. त्यांच्यावर आपण टीका करतो. पण त्यांच्यावर काय टीका करता. तसेच मराठी तरूणांना नोकरी करण्याची मानसिकता नाही त्यामुळेच त्यांना नोकरी नाही आणि छोकरी ही नाही. माझ्या या वक्तव्याच्या तरुणांना राग आला तर आला. कारण आता निवडणुका थेट चार वर्षानंतर आहेत तेव्हा पाहू.

 

 

 

 

Exit mobile version