जैन समुदायाला गॅसची गरज असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा, मंत्री लोढांचं आवाहन

जैन समुदायाला गॅसची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा," असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलं.

News Photo   2026 03 28T220453.034

जैन समुदायाला गॅसची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा, मंत्री लोढांचं आवाहन

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर (War) केलेल्या हल्ल्यानं आखातामध्ये सध्या युद्ध पेटलं आहे. जवळपास २९ दिवसानंतरही युद्धाची धग कमी झाली नाही. या युद्धाचा परिणाम भारतातील स्वयंपाकघरावरही झाला आहे. भारतात एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही एलपीजी मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. अशात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक मंदिराला मदतीचा हात पुढे केला आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या मतदारसंघातील एका मंदिराला मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

…तर तुमचं गॅस कनेक्शन रद्द होणार, LPG ग्राहकांसाठी काय आहे हा नियम?

२८ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान, जैन धर्मीयांचा ‘आंबील की ओली’ हा सण येत आहे. या सणादरम्यान भाविकांना अन्नासाठी आणि धार्मिक विधींसाठी गॅसची कमतरता भासू नये, या उद्देशाने लोढा यांनी जैन संस्था आणि सोसायट्यांना हे पत्र लिहिले आहे. “जैन समुदायाला गॅसची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे.

Exit mobile version