Download App

बिबट्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलच्या प्रशासनाला आदेश

मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर येथील पालक मंत्री कार्यालयात जनता दरबारच्या माध्यमातून नागरीकांच्या समस्या जाणून

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबटयांचा संचार वाढला आहे. (Vikhe Patil) बिबट्यांचा वाढता संचाराचे मोठे आवाहन असून पिंजरे लावूनही बिबटे सापडत नाही.यासाठी द्रोणचा अधिक वापर करावा असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहे. ते जनता दरबारात बोलत होते.

जलसंपदा विभाग आपल्याकडे असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल पाण्याची मागणी वाढणार असल्याने नियोजनात कोणत्याही चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या.सर्व विभागांनी एकत्रितपणे यासाठी काम करावे.रोजचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाॅर रुमला कसा येईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू ; डॉ. सुजय विखे पाटील

मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर येथील पालक मंत्री कार्यालयात जनता दरबारच्या माध्यमातून नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या, प्राप्त झालेल्या अर्जावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री विखे पाटील यांनी सर्व विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांची बैठक घेवून जिल्ह्यातील सर्वच प्रश्नाच्या बाबतीत गांभीर्यपुर्वक उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.

जनता दरबारात प्रामुख्याने अहील्यानगर महापालिकेच्या संदर्भातील असल्याचे पाहायला मिळाले.रिकाम्या जागांचे वाद तसेच महसूल विभागातील प्रलंबित असलेल्या प्रकरणावर कारवाई व्हावी आशा मागणीसाठी जनता दरबारात नागरीकांची संख्या अधिक होती.परीवहन भूमी अभिलेख, जलसंपदा,महावितरण या विभागाच्या संदर्भातील अर्ज जनता दरबारात मंत्री विखे पाटील यांना प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या सर्व अर्जावर गांभिर्याने कारवाई करून पालक मंत्री कार्यालयास संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकंमंत्र्यांनी अधिकार्यांना दिल्या.

follow us