Download App

‘जो शिर्डीच्या सहवासात आला त्याचं भलं झालं’; विखे पाटलांची शिंदे-फडणवीसांसमोर टोलेबाजी

Radhakrishna Vikhe Patil :  अहमदनगर,अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,माजी मंत्री मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषण करताना जोरदार टोलेबाजी केली.

त्यांनी बोलताना निळवंडे धरणासाठी करण्यात आलेल्या संघर्षाची आठवण सांगितली. यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला. त्यावेळी मधुकर पिचड यांनी आधी शेतकऱ्यांचे पुनर्वसन करा, अशी भूमिका घेतली, ही आठवण विखे पाटील यांनी सांगितली. तसेच यावेळी त्यांनी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर मार्मिक टिप्पणी केली.

हातकणंगलेत राजू शेट्टींची कोंडी; राष्ट्रवादीतून स्वतः जयंत पाटीलच उतरणार लोकसभेच्या मैदानात?

याआधी सदाशिव लोखंडे यांनी बोलताना काही मागण्या केल्या होत्या. त्यावर विखे पाटलांनी तुम्ही काही काळजी करु नका. जो शिर्डीच्या संपर्कात येतो त्याचे कल्याण झालेले आहे, असे म्हटले. तुम्ही शिर्डीच्या संपर्कात आहात तुम्ही काळजी करु नका. जो शिर्डीच्या सहवासात आला त्याचे भले झालेले आहे, कल्याण झालेले आहे. तुम्ही आता युतीमध्ये आहात. तुम्ही आता चिंता करु नका, चिंता करण्याची जबाबदारी आता आमची आहे, हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर सांगतो, असे विखे पाटील म्हणाले.

चौंडीतील वादावरून अजित पवारांचे कानावर हात; म्हणाले रोहितनं…

दरम्यान, सदाशिव लोखंडे हे शिर्डी या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. तर विखे पाटील हे राहता-शिर्डी या मतदारसंघातूल विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतात. सदाशिव लोखंडे हे आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत आलेले आहेत.

Tags

follow us