Radhakrushna Vikhe Patil : धरणातील गाळ काढण्यासाठी इतर राज्यांचं धोरण आणि महाराष्ट्राच्या धोरणाचा तुलनात्मक अभ्यास करुन सर्वसमावेशक धोरण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सहा प्रकल्पांत जिल्ह्यातील मुळा धरणाचा समावेश करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात धरणातील गाळ काढणेकामी करावयाच्या कार्यवाहीबाबतची सद्यस्थिती तसेच वाळू व माती विलगीकरणा संबंधित तंत्रज्ञाबाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
मोठी बातमी! पाकिस्तानचा मित्र तु्र्कीला भारताचा दणका; TRT वर्ल्डचे एक्स अकाउंट बंद
बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता तथा सह सचिव संजीव टाटू यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Video : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला पुणेकरांचा दणका; 1500 कोटींची डिल कॅन्सल
विखे पाटील म्हणाले, राज्य शासनाने धरणातील गाळ काढण्यासाठी राज्यातील ६ प्रकल्प प्रायोगिक तत्वावर निश्चित केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उजनी, नाशिक जिल्ह्यातील गिरणा, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी, अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा आणि जळगाव जिल्ह्यातील हातनुर प्रकल्पाचा समावेश आहे. या धरणातील गाळ काढण्याचा अनुभव लक्षात घेऊन राज्यातील अन्य धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
गाळ काढताना प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते याचा अभ्यास करावा. केवळ गाळावर लक्ष केंद्रित न करता या ठिकाणी असलेल्या वाळूवरही लक्ष केंद्रित करावे. गाळ काढण्यासाठी त्या त्या महामंडळाने राबविले पाहिजे. निविदा प्रक्रियेपुर्वी सखोल सर्व्हेक्षण करून वाळू व गाळाचे प्रमाण निश्चित करावे. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविताना विधी व न्याय विभागाचे अभिप्राय, पर्यावरण मान्यता आणि इतर सर्व वैधानिक बाबींची पूर्तता प्रत्येक महामंडळाने त्यांच्यास्तरावर करावी, अशा सूचनाही विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.