Download App

Nilanga Assembly Election 2024: निलंग्यात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा

या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमचे उदघाटक

  • Written By: Last Updated:

Sambhaji Patil Nilangekar : निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे (Sambhaji Patil ) अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ठीक 10:00 वाजता संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

मी एकटीच बहीण नव्हे तर लाखापेक्षा अधिक बहिणीचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी; प्राजक्ताताई मारवा निलंगेकर

या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमचे उदघाटक म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, तर अध्यक्ष म्हणून माजी खासदार सुनील गायकवाड, राहणार आहेत.

रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा

प्रमुख पाहुणे म्हणून, इंजि, विश्वजित गायकवाड, भाजप अनु सूचित मोर्चा अध्यक्ष, संतोष वाघमारे,माजी जि .प सदस्य सौ कुसुमताई हलसे, हनुमान जाकते, आर.पी.आय,जिल्ह्या उपाध्यक्ष अंकुश ढेरे, दिलीप गायकवाड, धम्मानंद काळे,एन .डी सोनकांबळे, देविदास कांबळे, आदी नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांची थेट लढत आता काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्याशी होणार आहे.

2019 मध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 32131 मतांनी पराभव केला होता.

follow us