Download App

मंत्री सावेंच्या मध्यस्थीला यश! 12 मागण्या मान्य झाल्यानंतर नागपूरमधील ओबीसींचं साखळी उपोषण मागे

ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवत नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र मंत्री अतुल सावे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे उपोषण स्तगित करण्यात आलं आहे.

  • Written By: Last Updated:

Minister Save’s mediation succeeds! OBCs in Nagpur end chain hunger strike after 12 demands accepted : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश जारी केला. त्यानंतर मराठा समाजात जल्लोषाचे वातावरण दिसले. मात्र, या निर्णयाला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्या अगोदरपासूनच नागपूरमध्ये मराठा आरक्षणाला विरोध करत ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू केले होते. आज 4 सप्टेंबर रोजी या उपोषणाचा सहावा दिवस होता. मात्र अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. या आंदोलकांच्या 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यासाठी मंत्री अतुल सावे यांनी केलेली मध्यस्थी फळाला आली आहे.

टीका करण्यापूर्वी आजोबांचे मार्गदर्शन घ्या… मराठा आरक्षणावरून मंत्री विखेंचा रोहित पवारांना खोचक टोला

सावे यांनी चर्चा करून आंदोलकांच्या 12 मागण्या मान्य केल्या

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये तसेच इतर 14 मागण्यासाठी नागपूरमध्ये साखळी उपोषणाला बसले होते. नागपूरच्या संविधान चौकात गेल्या सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू होते. त्यासाठी मंत्री अतुल सावे यांनी मध्यस्थी करत हे उपोषण थांबवलं आहे. यावेळी सावे यांनी चर्चा करून या आंदोलकांच्या 12 मागण्या मान्य केल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देणारच! काय करायचे ते… मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

अध्यादेश एका महिन्यात काढण्यात येणार

यावर बोलताना सावे म्हणाले की, ओबीसी आरक्षणावर गदा येणार नाही. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय अर्थ मंत्रालयाकडे पाठवला आहे. त्याचबरोबर ओबीसी आर्थिक विसाक महामंडळ, नागपूरमध्ये ओबीसी वसतिगृह दोन इमारती यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. तसेच यासोबत ओबीसींच्या 41 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्याचा अध्यादेश एका महिन्यात काढण्यात येणार आहे. अशी माहिती सावे यांनी दिली.

follow us