Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री असताना साखर संघाची एक बैठक पार पडली प्रत्येक वर्षी कारखाने कधी सुरू करावे कारखान्याची काय प्रश्न आहे याची एक बैठक होत असते सह्याद्री अतिथी गृहावर ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळी साखर समितीच्या शिष्टमंडळाची नेतृत्व अजित पवारांनी केलं होतं.
त्यावेळेस अजित पवार विरोधी पक्षात होते त्यावेळी चर्चा करताना वसंत दादा शुगर कारखान्याकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी सरकारची पद्धत आहे मात्र सरकारने त्या कारखान्याला अनुदान द्यावे अशी मागणी अजित पवारांनी केली. साखर संघाचे देखील काही मागण्या होत्या. नुकतेच इथेनॉलचे धोरण जाहीर करण्यात आले होते त्यामुळे सर्वांनीच मान्य केले की इथेनॉलमुळेच साखर कारखानदारी टिकून राहिली. त्यावेळेस मी अजित पवारांना एकच प्रश्न विचारला की मोदी किंवा अमित शहा यांनी इथेनॉलच्या धोरण आणल्यामुळे आपली कारखानदारी टिकून राहिली हे तुम्हाला मान्य आहे ना? तुम्ही तुमच्या संघाच्या वार्षिक तळामध्ये मोदी अथवा शहांचा फोटो लावला का यावर त्यांचे उत्तर नाही होते. त्यामुळे केवळ मतलबासाठी व फायद्यासाठी सरकारकडे यायचे वसंत दादा शुगर शुल्कचे पैसे तुम्हाला पाहिजे ही काही सरकारी संस्था आहे का किंवा सरकारच्या यावरती काही नियंत्रण आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहे आणि त्याला आम्ही पैसे द्यायचे का? सरकारचे दोन-तीन मंत्री तुम्ही त्या वसंत शुगर वरती नेमले पाहिजे. ज्या केंद्र सरकारने साखर कारखानदारांसाठी चांगले धोरण अवलंबले त्यांचे आभार मानण्याचे देखील तुमची दानत नाही तुम्ही सरकारकडे मदत मागतात ही माझी त्यावेळेस भूमिका होती या विषयावरती काही नंतर चर्चा करायचे असे ठरलो होतो मात्र ती चर्चा राहूनच गेली.
गेल्या अनेक वर्ष आपल्या राज्यातील जाणते राजे हे त्या मला घेऊन फिरायचे दिल्लीला जाऊ आयकर माफ करू इथेनॉल धोरणानु दहा वर्षे तुम्ही केंद्रात कृषी मंत्री राहिलात तुमच्याकडे ती जबाबदारी होती तुम्ही नाही इन्कम टॅक्स माफ करू शकला नाही तुम्ही धोरण असे शब्दात राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांवर ती देखील जोरदार टीका जोडली.
पुढे बोलताना मंत्री विखे म्हणाले की, केंद्र सरकारच्या काळात 15 हजार कोटींचा आयकर माफ करण्यात आला. सरकारने तुम्हाला मदत केली त्यामुळे तुमचे साखर कारखानदारी टिकून राहिली किमान त्यांचे आभार तरी तुम्ही माना म्हणून मी म्हटलो की नाही मनाची तर जनाची तरी ठेवा हा मुद्दा मी अजित पवारांना संबोधन बोललो नाही कधीच टीका करत नाही अशा शब्दात एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपण केलेल्या त्या वक्तव्यावरून घुमजाव केले.