Download App

मी ओबीसींसाठी लढणार, पदाची चिंता नाही, त्यांना जाऊन सांगा मला काढायला; भुजबळ आक्रमक

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींच्या सगेसोय़ऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी प्रवर्गातून मोठा विरोध होत आहे. याला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आता मराठा समाजालाही ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार असल्याने भुजबळ (Chhagan Bhujbal) चांगलेच संतापले. यावरून त्यांनी सरकावरही टीका केली. दरम्यान, मला कोणताही अभिलाषा नाही, त्यांना जाऊन सांगा मला काढायला, असं भुजबळ म्हणाले.

Munawar Faruqui : उद्ध्वस्त आयुष्याचा कारभारी ते बिग बॉसचा विजेता 

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तुम्ही सरकारमध्ये राहून आरक्षणाची लढाई लढणार की बाहेर पडून आरक्षणाची लढाई लढणार, असा सवाल त्यांना केला. यावर बोलतांना ते चांगलेच भडकले. भुजबळ म्हणाले, ते माझ्या पक्षाने ठरवावं. मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. मला ओबीसींच्या प्रश्नाचं दु:ख आणि संताप आहे. त्यापुढं कोणताही अभिलाषा नाही त्यांना जाऊन सांगा भुजबळांना काढा म्हणून, असा संताप भुजबळांनी व्यक्त केला.

मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्स्ट CM?; नितीश कुमार यांना घरी बसवत काढणार पगडी 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, मी 35 वर्षांपासून ओबीसींसाठी लढत आहे. मी ही लढाई लढतच राहणार आहे. कारण, मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला जातोय. आज मराठे ओबीसीत आले, उद्या सर्व मोठे समाज ओबीसीत येतील. याला आमचा विरोध आहे. ओबीसींच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. ओबीसींना संपवलं जात आहे. मराठा समाज मागच्या दाराने ओबीसींमध्ये घुसवला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

भुजबळांना आपला पाठिंबा नसल्याचे बबनराव तायवडे यांनी म्हटले आहे. सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसीवर अन्याय झाली नाही, अशी भूमिका तायवाडेंनी घेतली. यावरही भुजबळांनी भाष्य केलं. बबनराव तायवाडे यांचा पाठिंबा नसेल तर नसेल. आमच्याकडे 374 वाटेवरी होते. विविध जातीचे, ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता हजार वाटेकरी झाले. त्यामुळं आचा वाटा कमी होणार, हे सांगायाला तत्वज्ञानाची गरज नाही. मराठा समाज ओबीसीत आल्यानं आमचं आरक्षण संपल्यात जमा आहे, त्यामुळंच मी अध्यादेशाला विरोध करतोय, असं भुजबळ म्हणाले.

OBC आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं सरकार एकीकडे सांगायचं आणि दुसरीकडे आमंच आरक्षण मराठ्यांना दिल. ओबीसीच्या आरक्षणात सरकारने वाटेकरी घुसवले. ओबीसींच्या तोंडाचा घास पळवला. त्यामुळं मराठा आरक्षणाचा मुसदा रद्द करावा, अशी मागणीही भुजबळांनी केली

 

follow us