ओबीसी नेत्यांमध्ये फूट : छगन भुजबळांच्या आवाहनाला बबनराव तायवडेंचा ‘खो’

  • Written By: Published:
ओबीसी नेत्यांमध्ये फूट : छगन भुजबळांच्या आवाहनाला बबनराव तायवडेंचा ‘खो’

Babanrao Taywade : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. याला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला. ओबीसींच्या तोंडचा घास पळवल्याची टीका करत मसुदा रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, भुजबळांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी पाठिंबा दिलेला नाही. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळं ओबीसी (OBC) समाजावर अन्याय झाला नसल्याचं तायवाडे म्हणाले.

Fighterच्या यशानंतर सिनेमाच्या सीक्वलची जोरदार चर्चा; दिग्दर्शकांकडून मोठा खुलासा 

आज बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारने काढलेलल्या मराठा आरक्षणाचसंदर्भातला अध्यादेश आणि मसुदा रद्द करावी या भुजबळांच्या मागमीविषयी विचारले असता ते म्हणाले की, शासन निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, सरकारच्या निर्णयामुळं ओबीसींवर अन्याय झाला नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याचं गेलं नाही. मराठा समाजातील कुणबी नोंदी 57 लाख सापडल्या आहेत मात्र, यातील 99.99 टक्के नोंदी ह्या जुन्याच आहेत. केवळ छत्रपती संभाजीनगर विभागात 20,927 नोंदी नव्या सापडल्या. ह्या नोंदी 1967 पूर्वीच्या आहेत. त्यामुळं सरकारला कुणबी दाखले देणं बंधणकारच आहे. महत्वाचं असं की, नव्याने देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळं ओबीसींवर अन्याय झाला नाही, असं तायवाडे म्हणाले.

Ahmednagar Accident : पांढरीपुलावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, सगेसोयरा मुसदा हा जुन्या मसुद्यासारखाच आहे. तिथं पितृसत्ताक पध्दतीनेच दाखले दिले जाणार आहेत. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी वाढणार नाहीत, असं स्पष्ट मत तायवाडेंनी व्यक्त केलं.

छगन भुजबळ यांनी रविवारी मुंबईत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ओबीसींच्या हक्कासाठी सर्वांनी गटतट बाजूला ठेऊन एकत्र यावे, असे आवाहन केलं आहे. ओबीसीतील सर्व तीनशे चौऱ्याहत्तर जातींनी एकत्र यावं आणि 1 तारखेला आपआपल्या आमदार, खासदार आणि तहसीलदारांकडे obc आरक्षणाचा बचाव करण्याच्या मागण्या करा, असे आवाहन त्यांनी केलं केले. आता या भुजबळांच्या आंदोलनात सहभागी होणार की नाही याबाबत बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले की, भुजबळ यांच्यासोबत आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही, याबाबत पदाधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करणार आहे, असं ते म्हणाले.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube