Ahmednagar Accident : पांढरीपुलावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

  • Written By: Published:
Ahmednagar Accident : पांढरीपुलावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Ahmednagar Sambhaji Nagar Accident : काही दिवसांपूर्वीतच पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात झालेल्या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एक अपघाताची भीषण घटना समोर आी आहे. अहमदनगर- छत्रपती संभाजीनग (Ahmednagar Sambhaji Nagar Accident) महामार्गावर पांढरीपूल (Pandhari bridze) येथे रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. या अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडाचा मृत्यू झाला आहे.

Yami Gautam Pregnancy : यामी गौतम प्रेग्नंट? Viral व्हिडीओमुळे चर्चेला उधाण 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. या घटनेने पारनेरमध्ये खळबळ उडाली आहे. अनिल बाळासाहेब पवार (वय 20), सोनाली अनिल पवार (वय 22), माऊली अनिल पवार आणि सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, पारनेर ) अशी मृतांची नावे आहेत.

शिंदेंच्या निकालानंतर नार्वेकरांवर मोठी जबाबदारी : ‘पक्षांतर बंदी कायदा समिती’ अध्यक्षपदी नियुक्ती 

इमामपूर घाटाच्या उतारावर छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक (एचआर 38, एसी 5848) ने पुढं चाललेल्या मोपेड दुचाकी क्रमांक (एमएच 16, सीबी 5202) तसेच अन्य दुचारी क्रमांक (एमएच 16, एव्ही 1931) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये मोपेडवरील पवार कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल, नगर) हा जखमी झाले. मन सुन्न करणारी ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी (२८ जानेवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला.

दरम्यान, या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतले.

समोर आलेल्या माहितीनुसार, वडगाव सावताळ येथील पवार कुटुंब कापूरवाडी (ता. नगर) येथे कांदा काढणीच्या कामासाठी दीड ते दोन महिने नगर तालुक्यात होते. मृत अनिल पवार यांच्या मागे आजोबा, आजी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. एकाच वेळी कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने वडगाव सावताळ गावावर शोककळा पसरली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज