Maratha Reservation : ‘त्या नोंदीही शिंदे समितीने जाहीर कराव्या; बबनराव तायवाडेंची मागणी काय?
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत (Maratha Reservation) आहे. राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने न्या. शिंदे समिती गठीत केली आहे. या समितीने काम सुरु केले असून स्थानिक प्रशासनामार्फत नोंदींचा शोध घेऊन आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे. यातच आता ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा समोर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी आणखी एक मागणी केली असून लवकरच शिंदे समितीची भेट घेणार असल्याचे सांगितले. आधीच मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र घेतले आहेत. ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहेत त्याचा लाभ घेत असतील तर ही पण आकडेवारी जाहीर करणं ही सुद्धा न्या. शिंदे समितीची जबाबदारी आहे, असे तायवाडे म्हणाले.
तायवाडे म्हणाले, शिंदे समितीने राज्यात बारा प्रकारच्या दस्तऐवजात मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीची नोंद असल्याची तपासणी करत आहेत. तशा प्रकारचे आकडेही ते जाहीर करत आहेत. परंतु, हे आकडे घोषित करताना एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची नोंद एकदाच आहे की अनेकदा आहे याची छानणी आपण केली आहे का त्याची खात्री करून घ्यावी हे आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत. काही पाच किंवा सात ठिकाणी एकाच कुटुंबाचं एकाच व्यक्तीचं नाव आहे ते रिपीटेशन जास्त होईल आणि त्यामुळे हा आकडा खूप जास्त फुगलेला आहे अशी आमची शंका आहे. ती शंका दूर व्हावी हे म्हणणं आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत.
Aditya Thackeray : ठाकरेंचं मिशन कोकण! ‘खळा’ बैठकांतून साधणार निवडणुकांचे लक्ष्य?
पण जर असं झालं नसेल तर या दाखल्यांची छानणी करून एका माणसाचं नाव एकदाच ठेऊन तशा प्रकारची श्वेतपत्रिका काढावी. त्यानंतर जी काही आकडेवारी समोर येईल त्यातल्या किती लोकांनी आधीच मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र घेतले आहेत. ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहेत त्याचा लाभ घेत असतील तर ही पण आकडेवारी जाहीर करणं ही सुद्धा न्या. शिंदे समितीची जबाबदारी आहे. अन्यथा संपूर्ण ओबीसी समाजात फार मोठा संभ्रम निर्माण होत आहे. दहशत निर्माण होत आहे. हे दूर करण्यासाठी शिंदे समितीने प्रशासनामार्फत आकडेवारी जाहीर करावी.
नागपुरात 2 लाख 33 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात 35 नोंदी कुणबी मराठाच्या तर 11 नोंदी मराठा कुणबीच्या सापडल्या आहेत. तर या 2 लाख 34 हजारांपैकी किती जणांनी प्रमाणपत्र घेतले आहे. माझा दावा आहे की नागपुरात शंभर टक्के लोकांनी प्रमाणपत्र घेतले आहे. जर शंभर टक्के लोकांनी प्रमाणपत्र घेतले असेल तर हा नवा शोध कुठे आहे. शिंदे समितीचं काम नवा शोध घेण्याचं आहे. नवा शोध घ्यायचा असेल तर सापडलेल्या नोंदींपैकी किती जणांनी आधीच प्रमाणपत्र घेतले आहेत हे जाहीर करावे. कोणत्या नोंदी पहिल्यांदा सापडल्या.
Nana Patole : मराठा विरुद्ध ओबीसी हे तर सरकारचं.. नाना पटोलेंचा गंभीर आरोप