Nana Patole : ‘मराठा विरुद्ध ओबीसी हे तर सरकारचं’.. नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाने (OBC Reservation) उचल खाल्ली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. यात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकावर टीका करत सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप केला.
मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा सरकारचा डाव
पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली. हे आंदोलन मराठा विरुद्ध ओबीसी हे सरकार मुद्दाम घडवत आहे. हे पेटवण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत नाही. फडणवीस म्हणतात कंत्राटी पद्धती भरती करणार होते, त्याच काय झालं. वय झाल्यावर भरती करणार का? असा सवाल त्यांनी केला. आरक्षण हा मागास समाजाचा अधिकार आहे. जनगणना केली जात नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिमांतही अनेक मागास जाती आहेत. त्यांचीही जनगणना करून आरक्षण दिलं पाहिजे, असे पटोले म्हणाले. मराठा विरुद्ध ओबीसी हे सरकार प्रायोजित होऊन घडवत आहे. राज्यातील एक मंत्री एका समूहाबरोबर जाऊन चॅलेंज करत असतील तर लक्षात आलं पाहिजे की हे सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटवण्याचं काम सुरू आहे, असा दावा पटोले यांनी केला.
हिंमत असेल तर जातनिहाय जनगणना करा
काँग्रेसचे सरकार आले तर जातीनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे. एकामागून एक आरक्षणाचे प्रश्न समोर येत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न समोर आला आहे. या परिस्थितीत भाजपमध्ये दम असेल तर जातीनिहाय जनगणना करावी असे आव्हान पटोले यांनी दिले.
Nana Patole : दिल्ली अन् गुजरातवरून चालणारं हे आउटसोर्सिंग सरकार; नाना पटोलेंचा घणाघात
सूडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर कारवाई
चिडलेल्या भाजपचा चेहरा हेरॉल्डवर कारवाईच्या माध्यमातून दिसत आहे. पंतप्रधान यांच्या सभेला लोक जमा होत नाही. सगळीकडे हार निश्चित असल्यानं सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. हेरॉल्ड ही देशाची प्रॉपर्टी आहे, गांधी परिवाराचे पैसे नाही. धाड टाकून काहीच मिळणार नाही. आज न उद्या सत्य समोर येईल, घाबरण्याच कारण नाही.