Nana Patole : मोदी जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा उद्योग घेऊनच गेले; पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On Pm Narendra Modi : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर गभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात (Maharashtra)आले तेव्हा महाराष्ट्रातले उद्योगच घेऊन गेले, असा थेट आरोप कॉंग्रेस (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे. जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
केंद्र सरकारकडून मुंबईचं महत्व कमी केलं जात असल्याचा असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. त्यावरुन विरोधकांकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे. त्यातच नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा झाला. त्यांची शिर्डीमध्ये जाहीर सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर राज्यातले उद्योग गुजरातला घेऊनच गेले आहेत. आत्ताही आले तर काहिना काही घेऊनच जातील असं आम्ही दोन दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. महाराष्ट्रातील डायमंड झोन मुंबईमध्ये होता, तो आता त्यांनी सुरतला नेला आहे.
मुंबईमधील या डायमंड झोनमुळे आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. आता डायमंड मार्केटच सुरतला घेऊन गेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा राज्याचं नुकसान करुनच गेले आहेत. देण्याच्या जागी घेऊनच गेले आहेत, असाही आरोप नाना पटोले यांनी केला आहे.