रस्त्यांची साडेआठ हजार कोटींची कामं रखडली, NOC न देण्यासाठी वाहतूक पोलिसांवर दबाव, आदित्य ठाकरेंचे आरोप
Aditya Thackeray : मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनावर आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) जोरदार टीका केली आहे. मुंबई (Mumbai) शहरात एकूण साडेआठ हजार कोटी रुपयांची कामे खोळंबली आहेत. ही रस्त्यांची कामे होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांवर एनओसी न देण्याबाबत सरकारचा दबाव असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला. आमचे सरकार आल्यावर सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच केला ‘हा’ कारनामा
आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र डागलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी वर्षभरात मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिलं होतं. १ ऑक्टोबर ते ३१ मे या कालावधीत मुंबईतील रस्त्यांचे काम पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं. मात्र मुंबईत एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच्या तशी पडून आहेत. वाहतूक पोलिसांकडून एनओसी मिळत नसल्याची सबब सांगून रस्त्याचे कामं रखडवली जात आहेत. मोठ्या गाजावाज करून सहा हजार कोटीच्या कामांची घोषणा केली. नारळ फोडला. पण, ती कामेही पडूनच आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले, डांबरीकरणाची जी कामं आहेत, ती रखडली आहेत. त्यामुळं कॉंक्रीटकरणाचला वेग देतोत, असं सरकार म्हणतं. पण, ते तरी करा. मात्र, कुठलीच कामं होतांना दिसत नाही. कागदांवर कामं दिसतात. पण, प्रत्यक्षात काहीच कामं दिसत नाही. खड्डेमुक्त रस्ते देऊ अशी घोषणा करणाऱ्यांनीच रस्त्यांची कामं का खोळंबली याचा खुलासा करावा, असंही आदित्य म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार ऐकते. हे सरकार बिल्डर-कॉन्ट्रक्टरेचचं सरकार आहे. खोके सरकारमध्ये कॉन्ट्रक्टरचे लाड सुरू आहेत. गेल्या 10 ते 12 महिन्यांपासून आम्ही रस्त्यांचा प्रश्न मांडत आहोत. मुंबईत पाच पॅकेट कंत्राटदार आहेत. त्यापैकी एका कंत्राटदाराला टर्मीनेशन नोटीस मिळाली. या नोटीसला ठेकेदाराने उत्तर दिले. त्याची सुनावणी या आठवड्यात महापालिकेत होणार आहे. या सुनावणीनंतर कंत्राटदारावर कारवाई होते का, की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते, हे आम्हाला पाहायचं आहे. आमचं सरकार लवकरच येईल, आमचं सरकार ज्यांनी मुंबईला लुटलं त्यांना जेलमध्ये टाकणारच असा इशाराही त्यांनी दिला.