World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच केला ‘हा’ कारनामा

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच केला ‘हा’ कारनामा

AUS vs NZ : यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. ऑस्ट्रेलियाची टीम पहिला सामना भारताविरुद्ध आणि दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरली होती. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ऑस्ट्रेलियाने सलग तीन सामने तर जिंकलेच पण आपल्या फलंदाजीची ताकदही दाखवली आहे. सलग तीन सामन्यांत 350 हून अधिक धावा करणारा ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाने केला नवा विक्रम
आज धरमशाला येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा 27 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांनी न्यूझीलंडचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरविला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी दोन्ही बाजूंनी स्फोटक फलंदाजी करत अवघ्या 10 षटकांत 118 धावा आणि 19.1 षटकांत 175 धावांची भागीदारी केली.

World Cup 2023 : आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानचं काय होणार?

त्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांनी धावसंख्या पुढे नेली. अखेरीस ऑस्ट्रेलियाने 49.2 षटकांत सर्वबाद 388 धावा केल्या. विश्वचषकातील हा सलग तिसरा सामना आहे ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 350 हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सविरुद्ध सामना खेळला होता आणि त्या सामन्यातही त्याच शैलीत फलंदाजी केली होती. डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि ग्लेन मॅक्सवेलचे विश्वचषकातील सर्वात जलद शतक यामुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 399 धावा केल्या आणि त्यानंतर 309 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.

World Cup 2023 : ‘पाकिस्तान पुढील सामन्यात जिंकूच नये’; कॅप्टन आझमचा ‘काका’च भडकला

त्याआधी ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तान विरुद्ध होता आणि त्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 367 धावा केल्या होत्या, याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचा संघ 45.3 षटकात 305 धावांवर ऑल आऊट झाला आणि 62 धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे, सलग तीन सामन्यांमध्ये 350 धावांचा टप्पा पार करणारा ऑस्ट्रेलिया विश्वचषक इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.

न्यूझीलंडची धावसंख्या शंभरी पार
प्रत्युत्तरात मैदाना उतरलेल्या न्यूझीलंडने शंभरी ओलांडली आहे. न्यूझीलंडने 14 षटकांत 2 बाद 101 धावा केल्या आहेत. मिचेल 19 धावा करून खेळत आहे. रचिन रवींद्रने 14 चेंडूत 12 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडची पहिली विकेट डेव्हन कॉनवेच्या रूपाने पडली. 17 चेंडूत 28 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 6 चौकार मारले. न्यूझीलंडची दुसरी विकेट विल यंगच्या रूपाने पडली. 37 चेंडूत 32 धावा करून तो बाद झाला. त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube