World Cup 2023 : आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानचं काय होणार?

World Cup 2023 : आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानचं काय होणार?

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) रोमहर्षक लढत झाली. त्यात आफ्रिकेने पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला. त्यामुळे पाकिस्तान उपांत्यफेरीत दाखल होणे अवघड झाले आहे. आफ्रिकेचा संघ आता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आला आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचा डाव 46. 4 षटकांत 270 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने 91 धावांची खेळी केली. एकवेळ आफ्रिका हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. परंतु 250 धावांवर आफ्रिकेने आठ विकेट्स गमविल्या. त्यानंतर नववी विकेटही पडली. परंतु केशव महाराज आणि तबरीज शम्सी यांनी शेवटच्या गड्यासाठी झुंजार खेळी करत संघाला विजय मिळविला. पाकिस्तानच्या या पराभवाचा धक्का टीम इंडियालाही बसला आहे.

Pak vs SA: रोमहर्षक सामन्यात आफ्रिका एका विकेटने जिंकली ! पाकिस्तानने गाशा गुंडाळला?

या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत टॉपवर पोहोचला आहे. त्याचवेळी भारतीय संघाने आपला एक नंबर गमावला आहे. आता टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेतील टॉप 4 संघांबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलँड तर चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे.

या पराभवानंतर गुणतालिकेत पाकिस्तान आहे तिथेच आहे. मात्र, सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता आता संपली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे गरजेचे होते. एकवेळ अशी आली होती की पाकिस्तान हा सामना जिंकेल असे वाटत होते. परंतु, ते काही शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत उर्वरित तिन्ही सामने पाकिस्तानने जरी मोठ्या फरकाने जिंकले तरीही त्यांना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. परंतु, पाकिस्तानचे पुढील सामनेही सोपे नाहीत.

Hardik Pandya : टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांंड्या वर्ल्डकपमधून आऊट?

आफ्रिकेच्या विजयाने मोठा उलटफेर

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. 271 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेसमोर अनेक संकटे उभे राहिले. शेवटच्या दहा षटकात आफ्रिकेला विजयासाठी वीस धावांची गरज होती. 40 षटकांत 249 धावांत सहा विकेट्स आफ्रिकेच्या पडल्या होत्या. एडन मार्करम हा 91 धावांवर खेळत होता. पण शाहीन शाह आफ्रिदीने मार्करमला बाद करत सामना फिरविला. तर दुसऱ्याच चेंडूवर गेराल्ड कॉट्जी बाद झाला. 250 धावांवर आफ्रिकेचे आठ फलंदाज बाद झाले. त्यामुळे हा सामना एकदमच रोमहर्षक झाला. परंतु शेवटच्या विकेट्ससाठी केशव महाराज आणि शम्सीने झुंजार खेळी करत संघाला सामना जिंकून दिला आहे. क्विंटन डिकॉक 14 चेंडूत 24 धावा केल्या आहेत. तेंबा बावुमाने 28 धावा केल्या. डेविड मिलरने 29 धावा केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube