Minor Girl Raped In Pimpri Chinchwad : गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या आवारात एका कारने एक महिला (Minor Girl ) आणि लहान बाळाला चिरडलं तर एक महिलेने तिच्या प्रियकराची आपल्याच मित्रांसोबत मिळून हत्या केली. या दोन्ही घटना उघडकीस येताच पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ माजलेली असतानाचा आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुण्यात क्रूरतेलाही लाजवणारी घटना; पत्नीची हत्या केली व्हिडिओ बनवला अन् पोलिसांकडे गेला
ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळ खेळताना जवळीक साधत नराधम तरूणांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी आणि आरोपी हे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते आणि मद्यप्राशन केल्यावर मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला. एवढंच नव्हे तर त्या वेळेस पीडित मुलीची एक रीलस्टार मैत्रीणही त्याच फ्लॅटमध्ये हजर होती.
हा अत्याचार होत असताना पीडित मुलीचा फोन नातेवाईकांना लागला आणि त्यांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पीडितेच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. आई-वडिलांनी धावपळ करत मुलीला शोधलं आणि त्यानंत रावेत पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. त्या आधारे रावेत पोलिसांनी आरोपी आयुष आनंद भोईटे , सुशील बालद्र ठाकूर , रीतिक संजय सिंग यांना ताब्यात घेतलं आहे.
ट्रूथ अँड डेअर गेम खेळत अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षांची असून ‘नीट’ची परिक्षा देण्यासाठी ती पिंपरी-चिंचवड शहरात रहात होती. काही वर्षांपूर्वी त्या मुलीची 22 वर्षांच्या तरूणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ती मुलगी रीलस्टार आहे. मंगळवार, 21 जानेवारी रोजी त्या मैत्रिणीने पीडित मुलीला फोन करून एका दिवसासाठी घरात रहायला जागा मिळेल का अशी विचारणा केली. तिने हो म्हटल्यानंतर ती रीलस्टार पीडितेचे घरी रहात होती. त्यानंतर ती रीलस्टार मुलगी आपल्या मित्रांसमोर रावेत परिसरात एका पार्टीला गेले होती, तिथे त्या सर्वांनी मद्यप्राशन केलं होतं.