Download App

परदेशातून आले अन् थेट अजितदादांना भेटले; आमदार काळेंचा पवारांना रामराम!

NCP Political Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आपला पाठिंबा त्यांना दिला आहे. आशुतोष काळे गेल्या काही दिवसांपासून विदेशात होते. राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यानंतर आशुतोष काळे हे आपला पाठिंबा कोणाला देणार याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. पण त्यांनी अजित पवार यांची भेट घेत आपण अजितदादांसोबत असल्याचे जाहीर केले आहे. आशुतोष काळे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. ( MLA Aashutosh Kale Join Ajit Pawar Camp )

ते म्हणाले की, “कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पाठींबा दिला. आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आमचे दैवत आहेत. त्यांचे आशिर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदारसंघातील मतदारांचा पूर्ण पाठींबा राहील याची मला खात्री आहे.”

काही दिवसांपूर्वी आशुतोष काळे यांचे सासरे चंद्रशेखर घुले यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर काळेंनी विदेशातून आपले प्रतिज्ञापत्र अजितदादांना पाठविले होते. यानंतर आज त्यांनी अजित पवारांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. त्यामुळे आशुतोष काळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना रामराम केल्याचे स्पष्ट झाले आहे.

वळसेंना मतदारसंघात जाऊन उत्तर देणार; आमदार रोहित पवार आक्रमक

दरम्यान, काळेंच्या या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे दोघेच शरद पवारांसोबत राहिले आहे. बाकी संग्राम जगताप, किरण लहामटे, निलेश लंके, आशुतोष काळे या आमदारांनी अजित पवारांना आपला पाठिंबा दिला आहे.

Tags

follow us