Nitesh Rane On Sushma Andhare : ठाकरे गटाच्या पक्षांतर्गत वादावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मीठ चोळलं आहे. सुषमा अंधारे आणि आप्पासाहेब जाधव यांच्या वादात सुषमा अंधारेंची काही एक चूक नसल्याचा मार्मिक टोला त्यांनी लगावला आहे. तसेच आमदार नितेश राणे यांनी अंधारे-जाधव यांच्या वादानंतर विरोधकांकडून उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
Pune : शरद पवारांसमोरच अजित पवारांची ‘दादागिरी’; भर बैठकीत चंद्रकांत पाटलांना धरलं धारेवर
आमदार राणे म्हणाले, सुषमाताई आमच्या देवी-देवतांवर कितीही बोलल्या अन् आमच्यावर कितीही टीका केली तरी महिला म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाचं जिल्हाप्रमुख पद विकायला काढलं. कार्यालयाच्या एसीसाठी त्यांनी पैसे मागितले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्यावर होत असलेले आरोप खरोखर विचार करण्याजोगे असल्याचं त्यांनी म्हटलंय.
खासदार ड्रायव्हर, मंत्री गाडीत तरीही बागेश्वर बाबाला दणका बसलाच; पोलिसांची कारवाई
कारण जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती तेव्हा देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पद विकायला काढली असल्याचा आरोप केला होता. एवढंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचाही हाच आरोप आहे. त्यानंतर आताही हा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार आरोप केला जात असेल तर त्यामध्ये सत्य असून यामध्ये सुषमाताईंची काही एक चूक नसल्याचं ते म्हणाले आहेत.
Cannes 2023: असा भंगार ड्रेस कोण घालतं ? कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकची उडवली खिल्ली
राणे यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांनाही सोडलं नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत महाविकास आघाडी सरकारचा महावसुली असा उल्लेख करत टीका केलीय. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंसह त्यांची टोळी मोठ्या प्रमाणात वसुली करीत होती. लोकांकडून खंडणी मागत होते. म्हणूनच त्यांच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं असल्याचं ते म्हणाले आहेत. महावसुली केली म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामध्ये क्रिकेट बुकींग, खंडणीसारख्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचं ते म्हणाले आहेत.
सुषमाताईंसोबत जी घटना घडली त्याचं मी समर्थन करत नाही. कोणत्याही महिलेकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये, अशी आमची आणि भाजपची भूमिका असल्याचं राणे म्हणाले आहेत. दरम्यान, जे काही घडलंय त्यामध्ये सुषमा अंधारे यांची काहीच चूक नसून पद विकण्याचे आरोप याआधीही उद्धव ठाकरेंवर झाले असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.