MLA Pratap Sarnaik’s taunt at Thackeray brothers : संपूर्ण राज्यच लक्ष लागून असलेल्या महापालिका निवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर होत आहे. एकीकडे मतमोजणी सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि गुप्त बैठकांमुळे खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
‘मशाल विझली, इंजिनचा धूरही संपला’ – सरनाईकांचा टोला
शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत जोरदार टोलेबाजी केली. सरनाईक म्हणाले की, “राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना ठाकरे बंधूंनी केवळ शेवटचे तीन दिवस प्रचार केला. त्यांचे राजकारण फक्त मुंबई आणि ठाण्यापुरतेच मर्यादित आहे.” पुढे बोलताना त्यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली की, “आता मशालीची ज्योत विझली आहे आणि मनसेच्या इंजिनचाही धूरही संपला आहे. महाराष्ट्रात मुंबई-ठाण्याव्यतिरिक्त 27 महापालिका आहेत, पण ठाकरे बंधूंनी उर्वरित महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.”
पुणे, मुंबई, अहिल्यानगरमध्ये कोणाचा महापौर होणार अन् कोण मारणार बाजी?
प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंच्या निवडणूक रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “राज्यात 27 हून अधिक महापालिका असताना ठाकरे बंधूंचे लक्ष केवळ मुंबई आणि ठाण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. उर्वरित महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले. निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी गांभीर्य दाखवले नाही. केवळ शेवटचे तीन दिवस प्रचाराचे सोपस्कार पूर्ण करून आपण संपूर्ण महाराष्ट्र जिंकू शकत नाही, हे आजच्या निकालातून स्पष्ट होईल.”
