पुणे, मुंबई, अहिल्यानगरमध्ये कोणाचा महापौर होणार अन् कोण मारणार बाजी?

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर

  • Written By: Published:
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याने याचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला होणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

तर दुसरीकडे 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत विरोधकांकडून सत्ताधारी भाजप (BJP) आणि राज्य निवडणूक आयोगावर (Maharashtra Election Commission) देखील जोरदार हल्लाबोल करण्यात आले आहे. काही ठिकाणी मतदाराच्या बोटाला लावलेली शाई निघाल्याने (Maharashtra Municipal Corporation Election Result 2026) राज्य निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांना जिंकवण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

तर मतदान संपल्यानंतर समोर आलेल्या एक्सिट पोलनुसार मुंबईमहापालिकेत भाजप बाजी मारणार आहे. भाजपला 90 किंवा त्या पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याची शक्यता एक्सिट पोलमध्ये वर्तुवण्यात येत आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार यासाठी आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत युतीची घोषणा केली होती तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली होती आणि भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत युती करत निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदली असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज ठाकरेंच्या हाती पुन्हा निराशाच; एक्झिट पोलनुसार मनसेचं इंजिन यार्डातच; पुनरागमनाची आशा फोल

follow us