MPSC Paper Leak Rohit Pawar : नीट पेपरफुटीचा मुद्दा ताजा असतानाच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचं म्हणत बॉम्ब फोडला. त्यानंतर एक तासांनंतरच MPSC ने आपले सुत्र हलवले आहेत. एमपीएससीच्या विश्वसनीय सुत्रांकडून पेपरफुटीच्या आरोपावर धक्कादायक माहिती दिली आहे.
आमदार रोहित पवार यांनी 22 मार्च रोजी ऑफलाईन झालेल्या औषध निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप केला आहे. या परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर झाला असून 22 जुलैला अंतिम निवडीची यादीही प्रसिद्धी झाली. या संपूर्ण भरती प्रक्रियेनंतर एमपीएससीला पेपरफुटीबाबत तक्रार दाखल झाली. या तक्रारीची गंभीर दखल घेत तक्रारदाराने पुरावे सादर करण्याचे आदेश एमपीएससीकडून संबंधित उमेदवाराला देण्या आले आहेत. एवढंच नाही तर या उमेदवाराला प्रत्यक्ष चौकशीसाठीही बोलावण्यात आले आहे.
एमपीएसीकडून आलेल्या आदेशानंतर विद्यार्थी आज आयोगासमोर हजर राहणार, त्याआधी रात्रीच एका तक्रारदाराने एमपीएससीला नवा मेल पाठवून खळबळ उडवलीयं. ही तक्रार पूर्णपणे बनावट असल्याचं मान्य केलं आहे. आता पुन्हा परीक्षा लवकर होणार नाही म्हणून पेपर फुटल्याची बतावणी केली आणि फेरपरिक्षेसाठी बनाव रचल्याचा धक्कादायक खुलासा तक्रारदाराने इमेलमध्ये केला आहे.
औधष निरीक्षक पदासाठी 20 मार्च रोजी कथित संभाषण झाल्याचा दावा केला जातोयं. त्यानंतर आता चार महिन्यांनंतर 24 जुलैला एमपीएससीकडे ही तक्रार दाखल विलंबाने का झाली? तसेच काल आलेल्या इमेलची एमपीएससीकडून चौकशी सुरु असून पुढील काळात या प्रकरणात कोण अडकणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
