Download App

महाराष्ट्र प्रिमियर लीग बाबत रोहित पवारांचं मोठं विधान! म्हणतात…

Rohit Pawar : राष्टवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता #AskRohitPawar या मोहिमेबाबत सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्याला भरभरुन प्रतिसाद देत रोहित पवार यांना थेट प्रश्न विचारले. एका यूझरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी महाराष्ट्र प्रिमियर लीग बाबात मोठी घोषणा केली आहे.

एका यूझरने विचारलेल्या तामिळनाडू प्रिमियर लीग सारखी महाराष्ट्र प्रिमियर लीग सुरु करण्यात यावी अशी अनेकांची मागणी आहे. याबाबत आपले काय मत आहे. त्यावर रोहित पवार यांनी ‘लवकर’च असे उत्तर दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र प्रिमियर लीग रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही सल्ला दिला का, असा प्रश्न दुसऱ्या एका यूझरने विचारला असता, रोहित पवार यांनी सांगितले की, क्रिकेटमधे राजकारण आणू नको.. आणि व्याप्ती एवढी वाढव की जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देता येईल. निवडक हिरे पुढे आणता येतील जे केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशाचं नेतृत्व करतील.. असा सल्ला शरद पवार साहेबांनी मला दिला आहे, असे सांगितले.

करमाळ्याचा आदिनाथ साखर कारखाना आपण का नाही घेतला चालवायला? आपल्याकडून खूप अपेक्षा होत्या, तुम्ही घेतला असता तर आम्हाला चांगला दर भेटला असता, या एका यूझरच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, करमाळा कारखाना घ्यायचा होता. मात्र, करमाळा कारखान्याच्या बाबतीत काही राजकीय अडचणी आल्या. परंतु, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पर्याय उभा केला आहे.

Tags

follow us